बांधकाम कामगारांच्या आंदोलनाला यश लवकरच बैठक घेण्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्न घेऊन आज आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा धडकला.
यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेत कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट करावे, कामगारांना नुकसानकारक असणारे तालुका सुविधा केंद्र बंद करा, मंडळास ई प्रशासन धोरण लागू करा, कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करा शासन आदेशानुसार कामगार संघटने कडून अर्ज स्वीकृती प्राधान्य देण्यात यावे व कामगार पडताळणी संख्या दररोज ३०० करावी या प्रमुख मागण्यावर मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच कामगारांचे प्रश्न प्राधान्य सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.













