चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

युवा पिढीने सक्षम होऊन देशकार्य करावे! – कृष्णकांत चांडक

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या कार्यापासून प्रेरणा घेत युवा पिढीने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन देशकार्य करावे!” असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक आणि विश्व हिंदू परिषद कोषाध्यक्ष कृष्णकांत चांडक यांनी क चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करताना कृष्णकांत चांडक बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, इनर व्हील क्लब अध्यक्ष सोनाली जयंत, विश्व हिंदू परिषद नगर कार्यवाह भास्कर भोर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, सदस्य कांता जाधव, नितीन बारणे, अतुल आडे, आरती आडे, अविनाश आगज्ञान, समर्थ डोंगरे, मिथुन बोरगांव, ओंकार तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. सतिश गोरडे यांनी, “स्वातंत्र्योत्तर काळात गुलामगिरीच्या शृंखला नष्ट करण्यात यश प्राप्त झाले. श्रीराम मंदिर उभारणी किंवा क्रांतितीर्थ चापेकर वाड्याचे पुनरुज्जीवन ही त्याची प्रतीकं आहेत. विद्यार्थ्यांनी भावी काळात आपली कारकीर्द घडविताना देशाची प्रतिष्ठा उज्ज्वल राहील यासाठी योगदान द्यावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतिवीर चापेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर पथसंचलन करीत तिरंग्याला अभिवादन केले. सामुदायिक राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन करून स्वातंत्र्यदिनाचा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शाहीर आसराम कसबे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button