उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर झाले आमदार, शहराला आता पाच आमदार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर आमदार झाले. आजच्या विधान परिषद निवडणुकितून पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला. नाराजीचा सूर असला तरी आगामी महापालिका निवडणुकिसाठी शहर भाजपला अधिकची ताकद मिळाली. दोन वर्षांपूर्वी निष्ठावंत गटातून ओबीसी महिला म्हणून उमाताई खापरेंना भाजपने आमदार केले आता त्यांच्या जोडिला अमित गोरखे आले.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकले. त्यात अमित गोरखे या पिंपरी-चिंचवडकरांचा समावेश आहे. त्यांच्या रुपाने दोन वर्षांतच उमा खापरेनंतर शहरातील दुसऱ्या एकनिष्ठ तरुण भाजपाईला विधान परिषदेवर संधी मिळाली. गोरखे 26 मते घेऊन विजयी झाले आहेत.
अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील तसेच विश्वासातील आहेत. त्यांच्या रुपाने विधान परिषेदवर प्रथमच मातंग समाजाला संधी मिळाली आहे. राज्याची विधानपरिषदच नव्हे, तर राज्यसभेतही या समाजाला ती अद्याप मिळालेली नव्हती.