कविता म्हणजे कमी शब्दात व्यक्त होण्याचे भावनाशील माध्यम – जेष्ठ कवी कैलास भैरट
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” आषाढस्य प्रथम दिवसे ” या कवी संमेलनाच्या अध्यक्षिय मनोगतातून जेष्ठ कवी श्री कैलास भैरट बोलत होते . ते पुढे म्हणाले ” प्रत्येक जण व्यक्त होत असतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असते. जसे की,चित्रकार चित्राच्या माध्यमातून आपल्या भावना समाजापर्यत पोहचवत असतात. कोणी लेख कथा किंवा मनसोक्त बोलून व्यक्त होत असतो. तसेच कविता ही अनेक मनांना जोडणारी एक खळखळणारी नदी आहे, असे माझे मत आहे. ”
या प्रसंगी सुहास घुमरे (समरसता), करिष्मा बारणे (महिला आधाडी), योगशिक्षक पंकज पाटील, स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत लोहार तसेच मा चंद्रकांत सरडे व्यासपीठावर उपस्थित होते .
“संवाद व्यासपीठ ” चे संस्थापक अध्यक्ष हरीश मोरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संवाद व्यासपीठाच्या कार्याचा आढावा घेतला. ” मुलांसाठी आणि महिलांसाठी संभाषण कलावर्ग, वकृत्व स्पर्धाचे आयोजन , लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव वगैरे वगैरे कार्यक्रम संस्थेमार्फत राबविले जातात असे त्यांनी सांगितले .
सूर्यकांत लोहार यांनी श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे उपक्रम सांगितले तसेच इतर मान्यवरांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कवीसंमेलनात जवळ जवळ २१ मान्यवर कवींनी आपल्या सुरेख रचना सादर केल्या. तसेच श्री राऊत या जेष्ठ नागरिकाने ” मित्र संकटात गारव्या सारखा ” ही जेष्ठ कवी राऊत यांची प्रसिद्ध कविता गाऊन सादर केली .
सर्व कवींचा भगवतगीता देऊन सन्मान केला. जयश्री श्रीखंडे आणि मनीषा हिंगणे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. सुभाष साळुंखे यांनी आभार मानले .