फुगेवाडी अंडर पास पाठपुराव्याला यश – आशा शेंडगे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी, दापोडी आणि फुगेवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील मधील फुगेवाडी येथील रेल्वे अंडर पासचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वारंवार पाठपुरावा केल्याने अनेक वर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे. दीड ते दोन वर्षांत प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती माजी नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांनी दिली.
फुगेवाडी येथील नागरिकांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात खूप मोठे योगदान दिले आहे. अशा नागरिकांना कुटुंबातील एखादी व्यक्ती गमावल्यास स्मशानभूमी अथवा दफनभूमीत नेण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे अशा अत्यंत संवेदनशील विषयासाठी मी नगरसेविका म्हणून २०२० पासून शासनाकडे पत्रव्यवहार केला. प्रशासनाकडे या विषयावर सतत पाठपुरावा केला. वेळोवेळी रेल्वे अधिकारी यांच्यासोबत जागेवर जाऊन पाहणी केली.
१६ जुन २०२१ रोजी मनपाने रेल्वे विभागास पत्र दिले व फुगेवाडी येथील अंडरपास फिझीबल आहे का? याकरिता पाठपुरावा केला. महापालिकेने या कामासाठी `नाईस` या संस्थेची सल्लागार म्हणून केली. नाईस या संस्थेकडून श्री. आशिष धर्माधिकारी यांनी रेल्वे विभागाचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली. २७ जुलै २०२१ ला अंडरपास फिझीबल असल्याचे कळवले. २०२१ ते २०२३ मध्ये रेल्वे प्रशासनाने drawing मध्ये दोन-तीन वळा काही बदल सुचविले. बदल करून अंतिम drawing मध्ये रस्ता सात मीटर व त्या अंडरपासची उंची चार मीटरची असून दीड मीटरचा फुटपाथ नियोजित केला आहे. पुणे व्हिजनला drawing पाठ्वण्याआधी २४ ऑगस्ट २०२३ रोजी सादरीकरण आयुक्तांच्या दालनात सादरिकरण करण्यात आले.
दरम्यान, रेल्वे खात्याकडील परवानग्यांच्या प्रक्रियेत पुणे विभागाच्या विविध नऊ अधिकाऱ्यांच्या सह्या अपेक्षित असतात, त्यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पुणे यांची १२ मार्च २०२४ ला सही झाली आहे. त्यानंतर मुंबई विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या सह्या आवश्यक असतात. त्यातील शेवटची सही चिफ ब्रिज इंजिनिअर यांची ३ जुलै २०२४ रोजी झाली आहे. सद्या परिस्थितीत रेल्वे विभागास सुपरव्हिजन, कोडल व मेन्टेनस चार्ज भरले आहेत. येत्या १५ दिवसात आराखड्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एक महिन्यांची निविदा प्रक्रीया आहे. थोडक्यात साधारणतः पुढील दीड ते दोन महिन्यात कामाचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती सौ. शेंडगे- धायगुडे यांनी दिली.