दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कु.दुर्गा भोर(अध्यक्षा) दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे आणि कौशल्य विकासाचे धडे देण्यात आले आणि पर्यावरण व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती मोहीम घेतली एमआयडीसी टी ब्लॉक परिसरातील पर्यावरण संस्कार उद्यान येथे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर रणजीत पाटील सर इंडस्ट्रीचा असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर हे उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संस्कार उद्यान हे औषधी आणि नक्षत्र वन म्हणून करण्यात आलेले आहेत आणि हे वन पुढील काळात सुरक्षित राहण्यासाठी आणि शहरातील शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना वृक्षा बाबत संपूर्ण अभ्यास करता यावा अशा पद्धतीने पुढील काळामध्ये महानगरपालिकेने नियोजन करावे आणि यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना आणि डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज यांचे कायम सहकार्य महानगरपालिकेला असेल असे यावेळी दुर्गा भोर यांनी सांगितले.
डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यावेळी उद्योजकतेचे धडे देण्यात आले. आणि शिक्षण घेता घेता स्टार्टअप उद्योग आणि कौशल्य विकास कशाप्रकारे करावा याबाबत इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांनी मार्गदर्शन केले उद्यान विभागाचे श्री घोडे आणि त्यांचे सहकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते.
तसेच काही कंपन्यांनी येथील झाडांची देखभाल करण्याचे देखील मान्य केले असून पुढील काळात संपूर्ण एमआयडीसीमध्ये लवकरच 21000 वृक्ष लावण्याचा टप्पा गाठण्यात येईल असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
दुर्गा भोर यांनी युवा वर्गाला उद्देशून आपल्या प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक युवा आणि वतीने आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्यास प्रयत्न करावे असे आवाहन केले. यामध्ये अनेक युवा आणि युवतींचा उद्योजक आणि नागरिक यांचा सहभाग होता.