ताज्या घडामोडीपिंपरी

भोसरीमधील नागरिकांकडून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांचे उत्साहात स्वागत

Spread the love

भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग

 

भोसरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात रँली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. युवक-युवतींनी शिवाजीदादा यांच्यावर पुष्पवृष्टि केली. यावेळी महायुतीचे भोसरी विधानसभा समन्वयक दत्तात्रय भालेराव, अर्जुन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले.

भोसरी व शहर परिसरातील नेहरूनगर, अजमेरा-मासुळकर काँलनी क्रांती चौक, मयूर पॅरानोमा, झाकीर हुसेन चौक, नेहरूनगर येथील गणेश मंदिर तसेच चिखली व पाटीलनगर, तळवडे गावठाण व गाव, रुपीनगर, सीएनजी चौक, आळंदी रोड, छत्रपती शिवाजी चौक, ज्योतिबा नगर तळवडे, त्रिवेणीनगर आदी परिसरातही आढळराव पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील गणेश मंदिरात दर्शन घेऊन तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रँलीस सुरवात करण्यात आली. परिसरातील विविध ठिकाणी महिलांनी औक्षण करुन तसेच फुले उधळून रँलीचे जोरदार स्वागत केले.शहरातील विविध ठिकाणी महिलांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने शिवाजीदादा यांचे स्वागत केले. प्रत्येक ठिकाणी महिला रँलीला थांबवत औक्षण करुन स्वागत करताना दिसत होत्या. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जेसीबीतून फुले उधळून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

दरम्यान, यावेळी रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. अबकी बार, चारसो पार, एकच वादा शिवाजी दादा, जनतेचा पक्का निर्धार, शिवाजीदादाच खासदार, येऊन येऊन येणार कोण, शिवाजीदादांशिवाय आहेच कोण..अशा प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते. पुण्याच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवास्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच महायुतीमधील अनेक पदाधिकारी व नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयास आढळराव पाटील यांनी भेट देत संवाद साधला. युवकांचा बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे यावेळी युवकांनी दिले.

चिखली व तळवडे परिसरात रँली काढण्याच्या अगोदर उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन केले. ग्रामदैवतांचे दर्शन घेत रँलीस सुरवात केली. दरम्यान, या रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. यावेळी महिलांनी ‘अबकी बार, चारसो पार’ शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ‘एकच वादा, शिवाजी दादा’ अशी घोषणाबाजी केली.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, कार्यसम्राट आमदार महेश लांडगे, शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद, माजी महापौर वैशाली घोडेकर, राहुल जाधव, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, युवा नेते य़श दत्ताकाका साने, किसन बावकर, दिनेश यादव, माजी नगरसेवक विकास साने, चिंतामण भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, धनंजय भालेकर, रवींद्र आप्पा सोनवणे, माजी नगरसेविका संगीता नाणी ताम्हण, पांडा भाऊ भालेकर, गोपाळ तात्या भालेकर, धनंजय वर्णेकर, शरद भालेकर, विशाल मानकर, संगीता देशमुख, रघुनंदन घुले, अस्मिता भालेकर, अनिल भालेकर, खंडू भालेकर, सुनिल भालेकर, रमेश भालेकर, नवनाथ महाराज भालेकर, विलास भालेकर, विजय दिघे, पांडुरंग तात्य भालेकर, अमित भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक गीता ताई मंचरकर, शहर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संयोजक विजय फुगे, रवींद्र नांदुरकर, फारुख भाई इनामदार आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button