मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटत, शेतमालाला हमी मिळणार का? महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का. ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आहे. कोणाला काय वाटत याची नाही. आणि म्हणूनच मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणालेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माजी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. यावर माध्यमांनी डॉ. कोल्हे यांनी विचारणा केली असता डॉ. कोल्हे म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक आहे. कोणाची पहिली निवडणूक की शेवटची याची नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या वयाचा मान ठेवत मी त्यांना एवढंच सांगेल की आपण देशाचं बोलूयात, देशाचं, जनेतेच बोलूयात. त्यांना काय वाटत मला काय वाटत यापेक्षा जनतेला काय वाटत हे महत्वाचं आहे.