ताज्या घडामोडीपिंपरी

जी. के. गुरुकुल  शाळेत अग्निशमन विभागाकडून घेण्यात आली मॉकड्रिल

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून जी. के. गुरुकुल, पिंपळे सौदागर येथे आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगाने मॉकड्रिल घेण्यात आली.

अग्निशमन विभागाकडून दरवर्षी 14एप्रिल ते 20एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने अग्निशमन विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रहिवासी इमारती, मॉल आदी. ठिकाणी आपत्कालीन व आगीच्या प्रसंगाची पूर्वतयारी म्हणुन मॉकड्रिल आयोजित केली जाते..
दि-18/04/24 रोजी रहाटणी येथील जी. के. गुरुकुल शाळेत अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून मॉकड्रिल घेण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीवर मात करतेवेळी काय केले पाहिजे याकरिता शाळा प्रशासन व अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना आगीच्या व आणीबाणीच्या प्रसंगी शास्त्रीय पद्धतीने काय केले पाहिजे याची माहिती मॉकड्रिल घेऊन देण्यात आली.जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत योग्य तो समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल व वित्तहानी तसेच जीवितहानी होण्यापासून टाळता येईल.अग्निशमन विभागाकडून अग्निशमन उपकरणे यांचे हाताळणी प्रात्यक्षिके विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या कडुन करून घेण्यात आली..यावेळी सुमारे घटनास्थळी उपस्थित 300 विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी यांना अग्नी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सदर मॉकड्रिल करते वेळी सब ऑफिसर  विजय घुगे, सब ऑफिसर  चंद्रशेखर घुले,लिडींग फायरमन अनिल वाघ, लिडींग फायरमन विकास तोडरमल,ट्रेनी सब ऑफिसर अभिजित पाटील, वाहन चालक श्री. पाटील,ट्रेनी फायरमन परमेश्वर दराडे, मयुर नवगिरे, प्रशांत नवगिरे, ओंकार रसाळ, सखाराम चिमटे,निखिल जगताप हे उपस्थित होते व प्राचार्या. श्रीमती. मयुरी मेहता, प्रशासक श्री. प्रशांत नाईक यांचे समक्ष व सहकार्याने संदर्भीय मॉकड्रिल आयोजित करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button