महात्मा फुले यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली – काशिनाथ नखाते
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवजातीच्या कल्याणाचा आशय परिवर्तनशीलता, चिकित्सा करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सार्वजनिक सत्य धर्माचे विशेष महात्मा फुले यांनी मांडले. आधुनिक भारतातील समाज सुधारक, शिक्षणतज्ञ होते, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्यायासह श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम महात्मा फुले यांनी केले असे गौरवोद्गार कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथील महासंघाचे कार्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते यशवंत होळकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला,यावेळी सचिव चंद्रकांत कुंभार, निमंत्रक नाना कसबे, सुरज देशमाने, बालाजी बिराजदार, राजू गिराम,सुनिता पोतदार,लंकाबाई गायकवाड, कैलास सोनटक्के आदी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा यांनी शेतकऱ्यांच्या वेशात ब्रिटिश युवराज सभेत उपस्थित राहून शेतकरी ,कष्टकरी,कामगारांच्या व्यथा मांडल्या आणि खऱ्या भारताचे चित्रण केले.
महात्मा फुले यांनी वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देत श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्री – पुरुष कष्टकरी व्हावे …..कुटुंबा पोसावे आनंदाने… असा संदेश त्यांनी दिला त्याचबरोबर कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हाताला काम आणि त्यांना योग्य वेतन मिळते का नाही याचा नेहमी त्यानी नेहमी पाठपुरावा केला.