२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न हा हि निवडणूक जुमला – काशिनाथ नखाते
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- कोणतीही भक्कम योजना, विधायक अथवा मूलभूत काम न करता २०४७ साली भारत पूर्ण विकसित राष्ट्र बनेल असे सांगून भारताच्या आर्थिक विकासाबाबत २०१४ प्रमाणे विविध प्रकारचे दावे करून केवळ मोठ्या प्रमाणात भाजप आणि भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून व जाहिराती केल्या जात आहेत भारतावरील वाढत्या कर्जाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण चिंताजनक आहे ही गंभीर स्थिती पाहता महासत्ता हे चे स्वप्न दाखवणे हा सुद्धा केवळ निवडणुक जुमाला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष,नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन आणि कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या पत्रकात राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यानी म्हटले आहे की
पंतप्रधान यांच्या नेतृत्वात भारत देश प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर व विकसित राष्ट्रदिशेने मार्गक्रमण करत असलेला भारत २०४७ पर्यंत जगात महासत्ता बनेल असे बोलणे सोपे आहे,भारतात मोठे मनुष्यबळ आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत,ते बेरोजगार होत आहेत, मनुष्यबळाच्या शिक्षणाची सध्या कमतरता आहे. भारतात शिक्षण आणि कौशल्य विकासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मात्र मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष होते आहे. असे सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने नमूद केले आहे
भारताची मोठी आणि तरुण लोकसंख्या, वेगाने वाढणारा मध्यमवर्ग, गतिशील उद्योजकता आणि वाढती जागतिक आर्थिक एकात्मता यामुळं आर्थिक विकासाला गती मिळण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणे महत्त्वाचे आहे. दारिद्र्य कमी करणे, असमानता, मानवी भांडवल, पायाभूत सुविधांचा विकास तसेच पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर भारताला उपाय शोधावे लागतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.
भारताने सेमीकंडक्टरचे चीप करण्यासाठी इतक्या उशिरा अर्थसंकल्पात ७६० अब्ज रुपये राखून ठेवले मात्र उच्च शिक्षणाच्या खर्चाला कात्री लावली, याबाबत नुकतेच भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी याबाबत खडे बोल सुनावले आहेत भारतीय विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची पात्रता ही सन २०१२ च्या पातळीवर पोहोचलेली आहे तिसरीतील २०.५ % विद्यार्थ्यांना नीट लिहिता येत नाही आणि दुसरीतील मुलांना वाचता येत नाही अशी स्थिती आहे या देशात बेरोजगारी,वाढती महागाई, उद्योगांची वाताहात असे अनेक प्रश्न आहेत भारतावरील कर्जाचा बोजा पाहता एकूण स्थिती चिंताजनक आहे हे वारंवार अहवालातून स्पष्ट झाले आहे पंतप्रधानाने व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहणे गैर नाही मात्र त्या दृष्टीने नेमक्या कोयता कोणत्या उपाययोजना करीत आहेत केले आहेत हे सुद्धा भारतासमोर स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालामध्ये भारतावरील वाढत्या कर्जाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण चिंताजनक असून ही स्थिती अशीच राहिली तरी भारत येत्या तीन-चार वर्षांमध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो असा धोक्याचा इशाराही देण्यात आलेला आहे पण ते सरकारने गंभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकार घेत नाही असेही नखाते यांनी म्हटले आहे.