अडीच लाखावर मताधिक्याने आढळराव पाटील यांना विजयी करणार – उद्योग मंत्री सामंत
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातून ४५ वर खासदार निवडून देण्याचा शब्द महायुतीचे माध्यमातून दिला आहे. आपले शिरूरचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे असे समजून शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे २ लाख ५० हजारावर लीड देऊन विजयी करायचे आहे. यासाठी निवडणुकीत शिवसेना, युवासेना, महिला, आघाडी पदाधिका-यांनी दक्षता बाळगत कार्यरत रहावे असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकण बैठकीत केले.
शिरूर लोकसभेतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचणे प्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकण येथे बैठक उत्साहात झाली. या बैठकीस शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून बहुमूल्य असे मार्गदर्शन उपस्थितांनी केले. यावेळी शिरूर लोकसभेतील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी तसेच शिवसेना शाखा प्रमुख, गटप्रमुख व शिवदूत यांचे कामकाजाचा बैठकीत आढावा घेत त्यांना उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातून ४५ वर खासदार निवडून देण्याचा शब्द दिला आहे. आपले शिरूरचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे असे समजून शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे २ लाख ५० हजारावर लीड देऊन विजयी करायचे आहे. मात्र शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांनी गाफील न रहात, दक्षता बाळगत निवडणुकीचे काम करायचे आहे. यासाठी सर्वानी निरोप येईल, न येईल याची वाट न पाहता समजलेल्या माहितीचे निरोपाचे आधारे उपशीत राहून काम करायचे असल्याचे आवाहन सामंत यांनी केले. यावेळी शिरूरचे पदाधिकारी यांनीआपआपल्या तालुक्यातील माहिती देत आढावा सादर केला.
या प्रसंगी उपनेते इरफान सय्यद, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवानशेठ पोखरकर, पर्यावरण विभागाचे संचालक नितीन गोरे, तालुका प्रमुख राजु जवळेकर, युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय बाप्पु पठारे, तालुका प्रमुख विशाल पोतले, महिला आघाडी प्रमुख ज्योती आरगडे, शिवसेना जिल्हा संघटक निलेश पवार, खेड तालुका संघटक महादेव लिंभोरे, आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन शिंदे यांचेसह शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुका निहाय तसेच पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांचे कडून मतदार संघातील कामकाजाचा आढावा घेत पक्षात मान्यवरांना जाहीर प्रवेश देण्यात आला. शिरूर लोकसभा मतदार संघातील अनेक पदाधिकारी यांनी तसेच आळंदी व सोळू येथील असंख्ये कार्यकर्त्यांनी चाकण येथील बैठकीत शिवसेनेट ( शिंदे गट ) जाहीर प्रवेश केला. यात रोहिदास कदम, किशोर देशपांडे, ज्ञानेश्वर गारकर, पै. सोमनाथ(बाबा) पाटोळे, पै. विशांत कांबळे, पै.अक्षय त्रिभुवन, पै.हरीश साळवे, पै. आशिष पाटोळे, पै ओंकार ठाकूर, पै. अक्षय पाटील, पै. मनीष उमदे, पै.मोहित सावरकर, पै.अक्षय पाटोळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे हस्ते होते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सामंत यांनी सर्वांचे स्वागत करीत कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आळंदी शहर शिवसेनेचे वतीने शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचे हस्ते माऊलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
जुन्नर,आंबेगाव,खेड,भोसरी,शिरूर हडपसर या शिरूर लोकसभा मतदार संघातील तालुक्यातील पदाधिकारी यांनी आपापल्या भागातील शिवसेनेचे कार्याचा पक्ष संघटने तील कामाचा आढावा घेत मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील आढावा देत संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात काम करून पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्ष संघटने अधिक प्रभावी काम केले जाईल असे सागून महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून देवू असे सांगितले
प्रत्येक निवडणुकीत खेड ने लोकसभेला मोठे मताधिक्य देईल असे तालुका प्रमुख राजू जवळेकर यांनी सांगितले. यावेळी विजय आढारी यांनी आदिवासी विभागातील कार्याचा आढावा जिल्हा प्रमुख यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील खेड मधून लीड मिळाले आहे. यावेळी ही प्रचंड लीड देवू असे पुणे जिल्ह्या प्रमुख भगवानराव पोखरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, यासाठी सर्व प्रकारचे मतभेद विसरून खेड मधून मताधिक्य देणार आहे. शिवसैनिक दादांचा प्रचार करतील अशी ग्वाही पुणे जिल्हा संघटक प्रमुख भगवानराव पोखरकर यांनी सांगितले. विकास रेपाळे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. अल्पकाळात केलेले या बैठकीचे आयोजन आणि या बैठकीस मिळालेली प्रचंड उपस्थिती यातून महायुतीचे उमेदवार दादांची लीड नक्कीच वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.