ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

यंदाच्या उन्हाळ्यात मोहननगरचा जलतरण तलाव बंदच !

Spread the love

 

महापालिकेच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांची नाराजी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा
अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात मोहननगरचा जलतरण तलाव बंदच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाच्या या गलथान कारभारावर काळभोर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत काळभोर यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 14 मधील मोहननगर येथे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव आहे. मात्र, हा जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. या जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, लालटोपीनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव कोरोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद आहे.

क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हा तलाव नियमापेक्षा जास्त म्हणजे 14 फूट खोल आहे. क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच या तलावाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे.

काळभोर पुढे म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करावे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना यश म्हणून
या जलतरण तलावाच्या स्थापत्य विषयक सुधारणा करण्यासाठी स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या तलावाच्या कामाची वर्क ऑर्डर देता आली नसल्याचे स्थापत्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. आचारसंहिता संपताच कामाचे आदेश देण्यात येतील, असे क्रीडा स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले आहे.

चौकट
खेळाडू, शालेय मुले, नागरिकांची गैरसोय

मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची सातत्याने गर्दी असायची. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. असे असताना क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने हा तलाव बंद आहे. त्यामुळे खेळाडू, शालेय मुले, नागरिकांची गैरसोय होत असून लांबच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी जावे लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button