उमेदवारांना गुन्ह्यांची माहिती ३ वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक; पक्षांनाही आहेत कठोर नियम
नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी केली. लोकसभेच्या आणि सोबत होत असलेल्या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवता येणार नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रचार काळात तीनवेळा त्यांच्यावरील प्रलंबित गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट का दिले? याचीही माहिती संबंधित पक्षांना प्रसिद्ध करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २०२०ला हे आदेश दिले होते. या आदेशांची लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रचार काळात तीन वेळा त्यांच्यावरील आरोपांची माहिती वृत्तपत्र आणि टिव्ही चॅनलवर द्यावी लागणार आहे. शिवाय जे राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट देतात, अशा पक्षांना संबंधित उमेदवारांची माहिती पक्षाची वेबसाईटवर प्रसिद्ध करावी लागेल, तसेच वृतपत्र आणि टिव्ही चॅनलवर तीन वेळा ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.