ताज्या घडामोडीक्रीडापिंपरीपुणेमहाराष्ट्र

१४ वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ चे उद्घाटन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  खेळामुळे खेळाडूंमध्ये राष्ट्राबद्दलची अस्मिता आणि सांघिक वृत्ती निर्माण होते. हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय अभिमान असून या खेळाच्या जोरावर भारताने आपली ताकद पुर्ण जगाला दाखवली आहे. भारतीय हॉकीचे खेळाडू जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंचावत आहेत. आपली ताकद ज्या खेळात आहे त्या खेळाला आपण जागतिक पातळीवर प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य हॉकीचे अध्यक्ष कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले.

हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित १४ वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ चे उद्घाटन आज हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते, खासदार श्रीरगं उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आणि ऑलिम्पिक खेळाडूंच्या विशेष उपस्थितीत दिमाखात संपन्न झाले.

 मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सह संचालक सुधीर मोरे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक सुहास पाटील, हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, पुनित बालन ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन, जीएसटीचे उप आयुक्त धनंजय महाडिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, माजी रणजी खेळाडू भालचंद्र जोगळेकर, श्रीकांत वैद्य, अर्जुन पुरस्कार विजेते एम. सोमय्या, आंतरराष्ट्रीय खेळाडू अस्मिता लाकरा, ऑलिम्पिक खेळाडू अजित लाकरा, युनियन बँकेचे नवीन जैन, उपेंद्र पाल आदी उपस्थित होते.

         १४ वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेचा पहिला सामना केरळ आणि महाराष्ट्र या संघांमध्ये पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button