ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षणसांस्कृतिक

बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक – प्रा.डॉ. कस्तुरी पायगुडे राणे 

Spread the love
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लहान वयोगटातील बालकांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे श्रवण आणि सराव केला तर स्मृती सुधारणे, सामाजिक, भावनिक, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा विकास होण्यास उपयोग होतो असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. गायन आणि योगाद्वारे शारीरिक हालचाली सह भाषा आणि संज्ञानात्मक, कलात्मक विकास साध्य करता येतो असे प्रा. डॉ. कस्तुरी पायगुडे राणे यांनी सांगितले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘स्पीक मॅके’ (SPIC MACAY सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल) या संस्थेच्या वतीने ‘आरंभ’ या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख आणि आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. कस्तुरी पायगुडे राणे यांनी मार्गदर्शन केले.
   यावेळी संयोजक सुमन डोंगा, प्राचार्य डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. ‘स्पीक मॅके’ या संस्थेची स्थापना आयआयटी दिल्ली येथील प्रा. किरण शेठ यांनी १९७७ मध्ये देशव्यापी स्वैच्छिक, चळवळ सुरू करून केली. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून देणे. त्याचे श्रवण आणि गायन केल्यामुळे होणारे सकारात्मक बदल याविषयी संशोधन करणे यासाठी ही संस्था काम करीत आहे. त्या अंतर्गत ‘आरंभ’ या प्रकल्पाचे पुण्यातील पहिले सत्र नुकतेच एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
आरंभ अंतर्गत लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची प्रेरणा देणाऱ्या संवादात्मक माध्यमातून योग आणि संगीत समजून सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button