ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीमहाराष्ट्रसांस्कृतिक

मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या प्रसिद्ध 50 व्या खजुराहो नृत्य महोत्सवात चिंचवडच्या सायली काणे कलावर्धिनी डान्स कंपनी यांचे विशेष सादरीकरण

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरात प्रसिद्ध असलेल्या खजुराहो नृत्य महोत्सवाचे हे पन्नासावे वर्ष होते. प्रसिद्ध नृत्य गुरु डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर आणि भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कलावर्धिनी डान्स कंपनी यांचे खजुराहो येथे सादरीकरण झाले. यामध्ये सायली काणे यांच्या नेतृत्वाखाली भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती झाली. सायली काणे या चिंचवडमध्ये गेली 15 वर्ष कलाश्री नृत्य शाळा च्या माध्यमातून शास्त्रीय नृत्य वर्ग चालवीत आहेत तसेच त्या त्यांच्या गुरूंसमवेत भरतनाट्यम सादरीकरण करतात. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली आणि कलावर्धिनी डान्स कंपनीच्या आजवरच्या नृत्य प्रवासात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला.
प्राचीन खजूराहो मंदिराच्या परिसरात भव्य असे व्यासपीठ आणि जाणकार रसिक प्रेक्षकांसमोर नृत्य सादरीकरण करणे हे प्रत्येक शास्त्रीय नृत्य कला साधकाचे स्वप्न असते त्यामुळे महोत्सव च्या माध्यमातून सायली काणे कलावर्धिनी डान्स कंपनी यांच्या नृत्य सादरीकरणाला विशेष महत्व आहे.

नृत्य सादरीकरणामध्ये सायली काणे, कलावर्धिनी डान्स कंपनी, पुणे यांनी भरतनाट्यम समूह नृत्य सादर केले. प्रथम त्यांनी हरी हर सादर केले, भगवान श्री राम, भगवान विष्णूचे अवतार, पुष्पांजली अर्पण केल्यानंतर अर्धनारीश्वर नृत्य सादरीकरण झाले. याचं नृत्यदिग्दर्शनही अरुंधती पटवर्धन यांनी केलं होतं.
यानंतर राम नवरस श्लोकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये नऊ रस आणि नऊ भावना प्रभू श्रीरामाच्या जीवनातील विविध देखाव्यांद्वारे व्यक्त करण्यात आल्या. पुढील सादरीकरण थिल्लाना राग रेवतीमध्ये रचले गेले.

या यशा बाबत सायली काणे व कलावर्धिनी डान्स कंपनी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button