मातंग समाजाच्या पुनरुत्थानासाठी काम करणारे प्रभावी नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – अमित गोरखे
आर्टी आणि लहुजी वस्ताद स्मारक भुमीपूजना मुळे मातंग समाज एक दिलाने मोदी सरकार व महायुती सरकार बरोबर राहिल
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अजूनही खऱ्या अर्थाने वंचित असलेला महाराष्ट्रातील मातंग समाजाचा पुनरुत्थान करण्याचे शिव धनुष्य खऱ्या अर्थाने कोणी लिलया उचलले असेल तर ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नुकतीच त्यांनी बार्टीच्या धरतीवर आरटी सारखी संस्था आणून मातंग समाजाच्या पुढील पिढीच्या शिक्षणासाठीची दारे खुली करून दिली आहेत. याआधी अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचाराने जर्जर झालेले असताना ते सुव्यवस्थित करण्यासाठी ते महामंडळ पुनर्जीवित करून चांगल्या पद्धतीने त्या महामंडळाला निधी देऊन महामंडळाला उभारी आणण्याचे कामही माननीय फडणवीस साहेबांनी केलं आहे ,मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठे यांच्या स्टॅम्प तिकिटाचे अनावरणही माननीय देवेंद्रजी यांनी केले, त्याचबरोबर सातासमुद्रापार जाऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये आपल्या साहित्याची मुहूर्तमेढ रोवली त्या मॉस्को या ठिकाणी जाऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरणही केलं.. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला माहीत असताना मातंग समाजाची प्रेरणा असलेले लहुजी वस्ताद यांचे स्मारक अनेक वर्ष काम खंडित असताना संगमवाडी येथे पाच एकर जमीन हस्तांतरित करून त्याला योग्य बजेट देऊन त्या ठिकाणी भव्य स्मारकाबरोबर शैक्षणिक संकुल निर्माण करण्यासाठी भूमिपूजन माननीय देवेंद्र फडणवीस व या सरकारने पूर्ण केलं येणाऱ्या काळामध्ये चेंबूर येथील चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठेंचे स्मारक लवकरच करू ही घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे व लहुजी न चे स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आणून लहुजींच्या स्मारकाचे उद्घाटन आपण लवकर करू असंही त्यांनी खात्रीने सांगितल आहे, अ ब क ड वर्गवारी साठी समिती बनवून अभ्यास गट तयार करून त्याविषयीचा मार्गही शोधून काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
मातंग समाजाच्या वेदना खऱ्या अर्थाने संपवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आज तागायत अत्यंत चांगल्या पद्धतीने केल आहे, त्यामुळे आम्हा सगळ्या समाज बांधवांना माननीय देवेंद्र फडणवीस हे आमच्याच समाजातील नेतृत्व आहेत असेच आम्हाला जाणवत आहे.. एवढ्या तडफेने समाजासाठी काम करणारा व खऱ्या अर्थाने मातंग समाजाचे पुनरुत्थान करणारा लोहपुरुष नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सलाम करतो.