ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक
एक हात मदतीचा आगळावेगळा फॅशन शो
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन शो सारखे उपक्रम महिलांच्या आत्मविश्वास वाढीस मदत करतात. फॅशनच्या झगमगत्या दुनियेत केलेले रॅम्पवॉक हे आत्मविश्वास वाढविणारे असते. अशा स्पर्धेतील सहभागी महिलांबरोबरच कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींना रॅम्पवॉक करण्याची संधी विष्णुप्रिया सेव्हेन आर्टस् प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या फॅशनशो मध्ये देण्यात आली. अभिनेते देव झुंबरे व छायाचित्रकार गणेश गुरव यांनी चिंचवड येथे महाराष्ट्र आयकॉन २०२४ “एक हात मदतीचा” या संकल्पनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत किड्स कॅटेगरीत अध्या गाडे, मिस कॅटेगरीत तनिष्का वाडकर, मिसेस कॅटेगरीत पायल भाकरे, मिस्टर कॅटेगरीत वरुण नेहुल यांनी विजेते पदाचा मुकुट पटकावला.
नारीशक्ती सरिता साने, उद्योजक अशोक धुरी, उत्कुष्ट अभिनेता सचिन दानाई, उत्कुष्ट पत्रकार अनिल वडघुले यांना ‘महाराष्ट्र आयकॉन २०२४’ हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सुनील हिरूरकर, अपंग केंद्र प्रमुख सुनील चोरडिया यांच्या उपस्थितीत बक्षीस व पुरस्कार वितरण करण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून सोनाली कनखरे व मोनिका बांगाळ यांनी काम पाहिले.
विस्तृत विजेता निकाल – किड्स कॅटेगरीत फर्स्ट रनर अप पुर्वी आहिरे व सेकंड रनर अप तनुश्री कडु, मिस कॅटेगरीत फर्स्ट रनर अप ऐश्वर्या नारवणकर व सेकंड रनरअप श्रेया शिंदे, मिसेस कॅटेगरीत फर्स्ट रनरअप श्वेता रायकर व सेकंड रनर अप लक्ष्मी डावखरे आणि मिस्टर कॅटेगरीत फर्स्ट रनरअप आर्यन बजाज व सेकंड रनरअप निखिल फड यांनी बक्षीस पटकावले.
यावेळी सिने अभिनेते केतन लुंकड, प्रशांत तपस्वी, सुभाष खुडे, आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड, स्वाती मगर, राहुल जगताप, वसीम बागवान, गायत्री बनसोडे, राहुल रांजणे, महेश कंडपाल, राहुल सोनिगरा, ऋषिकेश साने, अनिकेत कांबळे, अमोल रोडे, राजेंद्र तरस, हेमंत कोठावडे, गणेश सुतार, धीरज कांबळे, ॲड. सुमेध डोंगरे, ओम काळे, तुकाराम डफळ, विनोद साळवे, बाबुराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.