Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»“सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी
ताज्या घडामोडी

“सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!” – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 February 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “गळ्यात सोन्याचा दागिना घालून मिरविण्यापेक्षा सुखाचा दागिना घालून आपल्यासह समाज सुखी करा!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रवचनकार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी पसायदान, एकता कॉलनी, आकुर्डी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमांतर्गत किसनमहाराज चौधरी यांना सांगवी येथील श्री गजाननमहाराज सर्व सेवा न्यासचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करताना ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. ‘करुनी सायास शिकविती…’ या संतवचनाला जागून सुमारे ३८ वर्षे अध्यापन केले. सेवाकाळात माझे सुमारे १५८ विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्चपदस्थ झाले, याचे खूप समाधान वाटते. शिक्षकांनी केवळ चार भिंतींच्या आत शिकविण्यासोबतच समाजाला आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ दिला पाहिजे. त्यामुळे सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त वेळा विविध विषयांवर प्रवचनसेवा घडली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर १३ पुस्तकांचे लेखन हातून घडले. ‘पसायदान’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत; तसेच धार्मिक विषयांवर लेखन प्रकाशित झाले आहे. ०५ सप्टेंबर २००० रोजी तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘आदर्श शिक्षक’ हा सन्मान प्राप्त झाला. त्यानंतर आता आपल्याकडून समाजाला देण्याची वेळ आली आहे, हे अंतर्मुख होऊन विचार करताना जाणवले. त्यामुळे सेवानिवृत्तीपश्चात वृद्धसेवा केंद्र, समुपदेशन, संतसाहित्य अभ्यास केंद्र असे उपक्रम जन्मगावी सुरू केले आहेत. जीवनाविषयी मी कृतार्थ आहे!” ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वेषांतर करून साधू होता येत नाही; तर सत्कर्म केल्याने संतत्व प्राप्त होते. आज साहित्यिकांच्या मांदियाळीत अध्यात्म आणि संस्कृती संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले!” अशी भावना व्यक्त केली.

ज्ञानेश्वरी आणि गाथा या ग्रंथांचे पूजन करून तसेच नलिनी सुरगुडे यांनी गायलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तानाजी एकोंडे यांनी तुकोबांच्या अभंगाचे गायन केले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मुरडे, राधाबाई वाघमारे, नितीन हिरवे, शोभा जोशी, सुरेश कंक यांनी किसनमहाराज चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपल्या मनोगतातून मांडले.

ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, अशोकमहाराज गोरे, शिवाजीराव शिर्के, फुलवती जगताप, रघुनाथ पाटील, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, एकनाथ उगले, हेमंत जोशी, कैलास भैरट, सुभाष चटणे, आनंद मुळूक, कांचन नेवे, मनीषा उगले, राजेंद्र पगारे, श्रीराम शिंपी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

मुरलीधर दळवी, मालती चौधरी, अपेक्षा चौधरी, निखिल चौधरी, अनिका, ग्रीष्मा, भावार्थ सुरगुडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास – रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे
Next Article पवना नदीकाठी उत्तर भारतीय समाजाला छट पूजेसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्या – विजय गुप्ता
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.