वंचित समाजापासून दुरावली गेलेली वैदिक यज्ञ परंपरा संमेलनाच्या निमित्ताने जोडली गेली – हेमंत हरहरे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” अग्नीचा शोध हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता.पण या अग्नीहून यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे मत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी नोंदविले आहे.पुरातन काळापासून अस्तित्वात असलेली एक धार्मिक व सामाजिक संस्था म्हणून यज्ञ किंवा यज्ञसंस्थेचा विचार महत्त्वाचा मानला जातो.यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा आला आहे आणि त्याचा अर्थ बहुतेक ठिकाणे श्रेष्ठ कर्म असाच घेतला गेला आहे.त्यागप्रधान कर्म म्हणजे यज्ञ कडे पाहिले जाते.संहितांचे जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत त्यामध्ये आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यास सांगितले आहेत. व्यक्तिगत सुखासाठी देवतांजवळ पशू, पुत्र, गृह,धन, पाऊस, अन्न, आरोग्य, इ. गोष्टींची याचना यज्ञांद्वारे केली जात असे.
व्यक्तिगत सुखाबरोबरच समाजसुख व राष्ट्रकल्याण यांचाही विचार यज्ञसंस्थेद्वारा केला जात असे. यज्ञसंस्थेचा विस्तृत विचार यजुर्वेदात मांडला गेला आहे. एकेकाळी यज्ञसंस्था ही समाजाचे केंद्र होते. यज्ञाच्या निमित्ताने लोक एकत्र येत. यज्ञासाठी जमलेल्या लोकांना धर्माचे महत्त्व सांगितल्या जात असे. यज्ञ फक्त विशिष्ट पुरोहित करत असायचे, त्यामुळे त्यांचे महत्त्व फार वाढलेले असायचे. ब्राह्मणग्रंथांमधे यज्ञाचे महत्त्व अनेक प्रकारांनी सांगितले आहे. ऋग्वेद, ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, भगवद्गीता, इ. ग्रंथात यज्ञसंस्थेचा विकास कसा झाला ते पहायला मिळतो.परंतु कालांतराने वंचित समाज हा यज्ञ संस्थेशी दुरावला गेला.यज्ञ संस्था व वंचित समाज यांमध्ये मोठे अंतर पाडले.सर्व अर्थाने हिंदु धर्मातील आत्मा ही वैदिक यज्ञ संस्था ही वंचित समाजापासून दुरावली गेली.ती आज दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा जोडली गेली जात आहे याचा आनंद होत आहे.”असे गौरवउदगार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंतजी हरहरे यांनी काढले.तर “ऋषींच्या परंपरेला साजेशा हवनाने मातंग ऋषी साहित्य संमेलनाचे उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा जोडली गेली.ही घटना स्वतंत्र भारतात महत्वाची आहे.” असे मत निलेशजी गद्रे यांनी नोंदवले .
पिंपरी चिंचवड येथील राजवाडा लॉंन्स काळेवाडी येथे ११ फेब्रुवारीस २०२४ रोजी मातंग साहित्य परिषद पुणे आयोजित दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे उद्घाटन भारतात आजवर कधीही न झालेल्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक वैदिक यज्ञाने झाले.आर्य समाज पिंपरी च्या उत्तम सहकार्याने ३६ होमकुंडे शास्त्रीय पद्धतीने निर्माण करण्यात आली. पिंपरी चिंचवड मधील विविध वस्त्या, विविध आर्थिक स्तर आणि बहुतांश मातंग समाज घटकांतील ७१ विवाहित जोडपी आणि त्यांच्या मुलांच्या हस्ते वैदिक यज्ञ हवन करुन केले. आचार्य सोनेगावकर आणि पंडित विवेक शास्त्री पौरोहित्य केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या चिंचवड येथील भटक्या मागास समाजातील लहान विद्यार्थ्यांनी आचार्य सोनेगावकर आणि पंडित विवेक शास्त्री यांच्या पौरोहित्य कार्यास सहभाग घेवून मंत्रोच्चार करुन सगळ्यांना आश्चर्याचा सखद धक्का दिला.
हे संमेलन उत्साहात पार पडले. ह्या संमेलनाने धार्मिक उत्थान,राष्ट्रीय एकात्मता ,समता व समरसता या तत्वांचा स्विकार करुन संमेलनाचे आयोजन करण्यात आले.या संमेलनामध्ये जवळपास सुमारे १४७१ पेक्षा साहित्यिक, कवी आणि श्रोत्यांनी आपला सहभाग नोंदवला. यज्ञ हवन कार्य हे केवळ पुरुषांचा आणि विशिष्ट समाजातील लोकांचा संस्कार आहे.हा गैरसमज दूर करण्याचे महत्त्वपुर्ण कार्य या मातंगऋषी साहित्य संमेलनाने साध्य केले. साहित्य संमेलनासारखा उपक्रम भारतीय पद्धतीने कसा साजरा केला जाऊ शकतो. ह्याचे आदर्श उदाहरण या साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने दिसून आले. महर्षी दयानंद सरस्वती यांची २०० वी जयंती १२ फेब्रुवारी असल्यामुळे जयंतीचे औचित्य देखील या कार्यक्रमास लाभले.
या पारंपरिक वैदिक यज्ञाच्या उद्घाटन प्रसंगी
संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे,संदिपान झोंबाडे,विलासजी लांडगे, सुहासजी पोफळे,दिगंबर रिद्धीवाडे,दिनेश यादव, अतुल आचार्य ,वरूण रिद्धीवाडे ,स्वराज गिरी,मनोज तोरडमल,शोभा जोशी,राजु आवळे,महेंद्र बोरकर,अविनाश शिंदे,माणिक पौळ,महेंद्र बोरकर ,भगवान पवार,अनयजी मुळे,नाना कांबळे,अनिल सौंदडे ,नरेंद्र पेंडसे ,पुजा भिसे व मा. श्री. शंकर जगताप स्वागताध्यक्ष उपस्थितीत होते आणि संमेलनाचे व महायज्ञाचे आयोजन हे मातंगऋषी साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ. श्री. धनंजय भिसे यांनी केले.