ताज्या घडामोडीपिंपरी

प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी. टी. गणवेश आणि स्वेटर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीची मान्यता

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या इयत्ता बालवाडी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी. टी. गणवेश आणि स्वेटर खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या प्रभाग क्र. ९ मधील महापालिका इमारतींचे व मिळकतींची स्थापत्य विषयक किरकोळ देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दिघी प्रभाग क्र. ४ मधील नियोजित मॅटर्निटी हॉस्पिटल इमारतीमध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

थेरगाव स्मशानभूमीतील गॅसदाहिनीचे चालन व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी तसेच महापालिकेच्या अ आणि ब प्रभागातील उद्यानांची स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ वाकड, ताथवडे आणि पुनावळे येथील मुख्य, अंतर्गत रस्त्यांचे व प्रभागातील इतर रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पी. जी. आय सर्जरी विभागासाठी आवश्यक मशीन खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पथविक्रेत्यांसाठी आकारणी करावयाचे नोंदणी शुल्क, जागा भाडे व दंड इ. बाबत तसेच महापालिकेचे प्रभाग क्र. २५ वाकड येथील उर्वरित रस्त्यांचे व प्रभागातील इतर रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिका इ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ करिता आरोग्य विभागाकडील औष्णिक धुरीकरणाचे काम करण्यासाठी तसेच अग्निशमन विभागाच्या कामकाजाकरिता १० नग बॅटरी ऑपरेटेड कॉर्डलेस ब्लोअर साहित्य पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. १० येथील गावठाण व औद्योगिक परिसरातील व प्रभाग क्र. ७ येथील लांडेवाडी, आनंदनगर, शांतीनगर, प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर मधील तसेच इतर परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या शिक्षण विभागातील आणि सर्व प्राथमिक शाळांमधील प्रिंटर व संगणक यंत्रणा देखभाल दुरूस्ती करण्यासाठी तसेच ह प्रभागातील उद्यानांची स्थापत्य विषयक दुरूस्ती करण्यासाठी आणि प्रभाग क्र. १५ मधील कै. पांडुरंग काळभोर सभागृह व व्यापारी गाळे इमारतीची दुरूस्ती व नुतनीकरण करण्यासाठी आणि प्रभाग क्र. ६ मध्ये धावडे वस्ती व परिसरातील देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या मिळकतकर संगणक प्रणालीची वार्षिक देखभाल दुरूस्ती करणे व प्रणाली अद्ययावत ठेवण्याच्या कामकाजाकरिता तीन अतिरिक्त सॉफ्टवेअर डेव्हलपर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button