ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

आळंदीत गीता भक्ती अमृत महोत्सवातील अध्यात्मिक उत्साहाला उधाण

Spread the love

 

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  गीता भक्ती अमृत महोत्सवात परमपूज्य अध्यात्मिक गुरु आणि समाजात परिवर्तन आणणारे आदरणीय श्री चंद्रकांतदादाजी पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, तसेच महंत श्री देवप्रसाददास स्वामीजी महाराज आणि आदरणीय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा सहावा दिवस श्रद्धामय वातावरणात सुरु झाला. दैवी वातावरणात अजून उत्साह वाढवण्यासाठी, तीर्थांची राजधानी आळंदी, पुणे येथे पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन दिवसाची सुरुवात झाली.

भक्त आणि संतांचा हा मोठा मेळावा हे आपल्या देशाच्या मूल्यांचे आणि तत्त्वांचे मोठे संवर्धन आहे असे सांगत श्री. चंद्रकांतदादाजी पाटील म्हणाले, “हा महोत्सव म्हणजे आपली धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्ये अजूनही टिकून आहेत आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील याची साक्ष आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांतील पवित्र शिकवण पुढे नेण्यासाठी अशा भव्य संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल मी स्वामीजी आणि संपूर्ण गीता परिवाराचा आभारी आहे.”

आजच्या दिवसाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण होते परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली भक्तांनी ज्ञानेश्वर माऊलींची पार पडलेली “मानस पूजा”. यानंतर पवित्र आरती करण्यात आली.

महोत्सवाच्या सहाव्या दिवसाच्या सोहळ्यांमध्ये श्रीमद्भागवत कथा, वेदशास्त्र संवाद, आदरणीय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांचे भक्तिरस गायन, कृतज्ञता ग्यापन पर्व आणि गीता परिवार लिखित आणि डॉ. डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, पुणे यांनी सादर केलेले महानाट्य – यह पुण्य प्रवाह हमारा यासारख्या अनेकविध कार्यक्रमांचा समावेश होता. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, म.म. स्वामी श्री प्रणवानंदजी महाराज, आणि डॉ. कल्याण गंगवालजी यांच्या शुभ उपस्थितीत श्रीमद्भागवत कथा पाठ संपन्न झाला.

“आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरातील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे हा खरोखरच माझा बहुमान आहे. मी अशा अध्यात्मिक संमेलनांना उपस्थित राहण्यास उत्सुक असतो कारण आपल्या आत्मशुद्धीसाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.”

स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांनी यावेळी उपस्थित आदरणीय नेते आणि १५ हजार भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, “श्रीमद्भगवद्गीता आणि वेदांची शिकवण ही एक समृद्ध समाज तयार करण्यासाठी आणि प्रमुख आध्यात्मिक गुरु, नेते जगभरातील लाखो लोकांना धार्मिक मार्ग स्वीकारण्यास प्रेरित करतील.”

*गीता भक्ती अमृत महोत्सवाविषयी*

वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा अध्यात्म, भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. या कार्यक्रमात २००० हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य, अभूतपूर्व भव्य ८१ कुंडीय महायज्ञ केला जात आहे. त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल. ४५० हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button