ताज्या घडामोडीपिंपरी

तुम्ही पर्यावरण वाचवा, पर्यावरण तुम्हाला वाचवेल, स्वच्छता मोहिमेतून दिला संदेश-  अण्णा जोगदंड

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने दत्तगड दिघीच्या डोंगरावर प्लास्टिकच्या बाटल्या, कागद व सर्व साहित्य टेम्पो भरून सर्व कार्यकर्त्यांनी गोळा केले, स्वच्छता मोहिमेचा उद्देश असा आहे की पाचशे वर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नका, दत्तगडावर काही भक्त व ट्रेकिंग साठी येणारे काही नागरिक पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थासाठी वापरलेला प्लास्टिकच्या पिशव्या,आणि डोंगराच्या पायथ्याशी मद्यप्राशन करून त्या ठिकाणी टाकलेल्या बाटल्या असे एकूण टेम्पो भरून साहित्य निघाले.
कोरोना काळात अनेकांचे ऑक्सिजन आभावी जीव गेले पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजनची नितांत गरज भासणार आहे. प्रत्येकांने पर्यावरणासाठी झटले पाहिजे, मी प्लास्टिक टाकणार नाही, माझ्यामुळे पर्यावणाची हानी होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.

” चला घरातून निघु, दत्त डोंगर प्लास्टिक मुक्त करू” असे अभियान यावेळी राबविण्यात आल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीची शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केले. वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करा, आपला वाढदिवसा दिवशी एक झाड लावून त्याचे संरक्षण करण्याच्या आव्हान ही त्यांनी केले. यावेळी पर्यावरण वाचवा, वृक्षतोड टाळा, प्लास्टिक मुक्तीचा संदेशही यावेळी त्यांनी घातलेल्या शर्टवर दिला होता.

अविरत श्रमदान दिघी संस्थेचे पदाधिकारी ऋषिकेश जाधव जितेंद्र माळी हे अविरतपणे झाडांना पाणी घालून श्रमदान करत असल्याचे सांगितले.
स्वच्छता अभियान संपल्यानंतर त्या ठिकाणी पर्यावरणावर छोटीसे कवी संमेलने घेण्यात आले. योगिता कोठारी यांनी आई अंबाबाई पर्यावरणाचे रक्षण कर अशी साद घातली तर अण्णा जोगदंड यांनी पर्यावरणावर रचना सादर केली, वृर्षा मोरे यांनी या जगण्यावर शतदा प्रेम करावे, गोरखनाथ वाघमारे यांनी आई वर रचना सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी स्वच्छता अभियानाचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, अविरत श्रमदान संस्था दिघीचे ऋषिकेश जाधव, जितेंद्र माळी, प्रकाश वीर यांनी आयोजन केले होते तर यामध्ये गुणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे, संगीता जोगदंड ,शंकर नाणेकर ह भ प शामराव गायकवाड ,बाळासाहेब साळुंखे ,शिवराम गवस या गुणवंतांनी सहभाग नोंदवला ,कामगाराबरोबरच जितेंद्र माळी, योगिता कोठारी , मराठवाडा जनविका संघाचे प्रसिद्धीप्रमुख अमोल लोंढे, विकास शहाणे, धनंजय महाले मयूर पाटील, भैरू गुरव, पिलानी घाटे सह अविरत श्रमदान संस्थेचे व मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अनेक पदाधिकारीयांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button