ताज्या घडामोडीपिंपरी

पवन मावळात 15 कोटींच्या कामाची उद्घाटने, भूमिपूजन शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती दौरा

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे सुरू आहेत. आदिवासी पाडे, वाड्या, वस्त्या असा विस्तारलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधी, सामाजिक न्याय, जिल्हा नियोजन मधून आलेल्या निधीमधून केलेल्या विविध 15 कोटींच्या विकास कामांचे  उद्घाटन व भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,  उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, मुन्ना मोरे यांच्यासह सोमाटणे, शिरगाव, पुसाणे, पिंपळखुटे, दिवड,बेबेड ओव्हळ, ओव्हळे, धामणे, डोने, परंदवाडी, आढले बु, खु, चांदखेड, पाचाने, कुसगाव गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी सुरू झालेला दौरा रात्री उशिरापर्यंत सूरु होता. रात्री उशीर हेऊनही ग्रामस्थ,गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी मावळमधील विविध गावात अंतर्गत रस्ते, मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. गावावात रस्ते मजबूत केले आहेत. कोरोना महामारीतही मावळचा विकास रखडला नाही. पुणे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळवत मावळमधील विकास कामे सुरू ठेवली होती. अनेक कामे पूर्ण झाली असून लोकार्पण केले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत  पाणीपुरवठा सक्षम करण्यास प्राधान्य दिले.  खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्घाटने, भूमिपूजन करण्याचा झंझावाती दौरा सुरू आहे. गावातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार बारणे यांचे आभार मानले.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा अभाव होता. डांबरीकरणाचे रस्ते नव्हते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते. रस्त्याने चालणे कठीण होत असे. त्यामुळे  गावातील रस्ते विकास करण्यावर भर दिला. वाड्या, वस्त्यांपर्यंत रस्ते करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक गावांमधील रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर, काही गावातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. विविध गावात सभामंडप उभारले आहेत. रस्त्यांसह सर्व कामे दर्जेदार, ठिकाऊ केली आहेत. भूमिपूजन केलेल्या कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button