ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिक्षण
राज कपूरांचे सिनेक्षेत्रातील योगदान अभूतपुर्व – राज्यपाल रमेश बैस
पहिल्या विश्व-राज कपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्काराचे वितरण
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज कपूर व एकंदर कपूर परिवाराचे सिने क्षेत्र व व्यवसायातील योगदान अभूतपूर्व आहे. पृथ्वीराज कपूर यांनी सुरु केलेली मनोरंजनाची परंपरा त्यांच्यानंतर राज कपूर यांनी लिलया खांद्यावर पेलली. राज कपूर यांचा काळ खऱ्या अर्थाने भारतीय सिनेसृष्टीचा सोनेरी काळ होता. ज्याने मनोरंजानशिवाय लोकांना प्रेरित देखील केले आहे. तसेच त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्रीय एकता वाढविण्याचे देखील काम केले. त्यांचे चित्रपट व त्यांच्या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने विश्वराजबाग येथील संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोम येथे आयोजित पहिल्या विश्व-राज कपूर सिने रत्न गोल्डन पुरस्काराच्या वितरण समारंभा प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक किरण शांताराम, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक एन. चंद्रा, प्रसिद्ध अभिनेते गजेंद्र चव्हाण, सिनेनिर्माते सिद्धार्थ काक, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी विश्वशांती कला-अकादमीचे सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर, माईर्स एमआयटीच्या सरचिटणीस सौ.स्वाती चाटे-कराड, उपाध्यक्षा सौ.ज्योती ढाकणे-कराड, डाॅ.मुकेश शर्मा आदी उपस्थित होते.
राज कपूर यांना देण्यात आलेल्या पहिल्या विश्व-राज कपूर सिने रत्न गोल्डन पुरस्काराचा स्विकार त्यांचे चिरंजीव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते रणधीर कपूर यांनी केला. तसेच याप्रसंगी राज कपूरच्या यांच्या बहुतांश चित्रपटांतील गाण्यांना सुमधूर आवाज देणाऱ्या मुकेश यांना देण्यात आलेल्या पुरस्काराच स्विकार त्यांचे चिरंजीव नितीन मुकेश यांनी केला.
राज कपूर यांना देण्यात आलेल्या पहिल्या विश्व-राज कपूर सिने रत्न गोल्डन पुरस्काराचा स्विकार त्यांचे चिरंजीव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते रणधीर कपूर यांनी केला. तसेच याप्रसंगी राज कपूरच्या यांच्या बहुतांश चित्रपटांतील गाण्यांना सुमधूर आवाज देणाऱ्या मुकेश यांना देण्यात आलेल्या पुरस्काराच स्विकार त्यांचे चिरंजीव नितीन मुकेश यांनी केला.
राज्यपाल बैस यावेळी बोलताना पुढे म्हणाले, मी राज कपूर यांचे सिनेमे पाहतच लहानचा मोठा झालो आहे. पूर्वी सिनेमाघरात लागलेले ‘मेरा नाम हैं जोकर’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ हे चित्रपट मी आवर्जून पाहिले आहेत. त्यामुळे राज कपूर यांचे भारताच्या कानाकोपऱ्यात प्रेक्षकांच्या मनावर असलेले गारूड मी जवळून अनुभवले आहे. आता राज्यापाल झाल्यानंतर साहजिकच प्रोटोकोल असल्याने सिनेमे पाहता येत नाहीत मात्र राज कपूर यांच्या चित्रपटांतील मुकेश यांनी गायलेली गाणी वेळ मिळेल तेव्हा गुणगुणत असतो, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी बोलताना किरण शांताराम म्हणाले, राज कपूर व माझे वडील व्ही.शांताराम यांच्या अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांना जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या आठवण असलेल्या या विश्वराजबागेचे जतन प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांनी अत्यंत सुंदर प्रकारे केले आहे. राज कपूर यांच्या इच्छेप्रमाणे विश्वराजबागेत ज्ञानदानाचे काम होतंय यापेक्षा चांगली श्रद्धांजली त्यांना आणखी काय असेल..! असेही त्यांनी यावेळी म्हटले.
अखेरीस आपल्या ८३ व्या जन्मदिनाप्रसंगी बोलणाऱ्या प्रा.डाॅ. विश्वनाथ दा. कराड यांनी राजबागेची पुढे विश्वराजबाग कशी साकारली गेली याच्या आठवणी सांगितल्या. ज्यात त्यांनी राजबागेचे हस्तांतरण होतानाच्या अनेक प्रसंगांना व राज कपूर यांच्या भावपूर्ण आठवणींना याप्रसंगी उजाळा देताना वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार देखील मानले. प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी प्रास्ताविक व सौ. ज्योती ढाकणे-कराड यांनी आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
“मेरा जुता है जापानी..!”
अटबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात असताना मला अनेक देशांचा दौरा करण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी युरोपच्या दौऱ्यावर असताना मी जेव्हा मी भारतातून आलोय, असे सांगितले तेव्हा समोरून आपसुक पणे “मेरा जुता है जपानी वाला भारतच ना..” असा प्रतिसाद आल्याने माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. या प्रसंगातून राज कपूर यांच्या सिनेमाचे गारूड हे केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही किती मोठे होते, हे मला समजले, अशी आठवण देखील राज्यपाल बैस यांनी यावेळी बोलताना सांगितली.