काळेवाडी येथील पार्थ प्रमोद गायकवाड सनदी लेखापाल उत्तीर्ण
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आवड असेल तर सवड मिळते या म्हणीप्रमाणे मग क्षेत्र कोणतेही असो त्या-त्या क्षेत्रात अनेकांनी चमकदार कामगिरी पार पाडली. असाच पार्थ प्रमोद गायकवाड याला आवड लहानपणापासूनच क्रिकेटची पार्थ चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिंचवड विभागातील मार्व्हिनिअस कॉन्व्हेंट स्कुलमध्ये 2017 साली झाले. गुण चांगले मिळाले आई प्राध्यापक वडील लघुउद्योजक त्यांनी इतर क्षेत्रात जाण्याचा आग्रह धरला. तरी पार्थला क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याने वाणिज्य क्षेत्र निवडून सन 2022 साली बी.कॉम पदवी प्राप्त केली. दुसरीकडे थेरगाव येथील वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीत क्रिकेट खेळ सांभाळून सी.ए.चा अभ्यासही करीत होता. सन 2019 साली सी.ए.फौंडेशन सन 2020 मध्ये इंटरमिजिएट व जानेवारी 2024 साली दोन्ही ग्रुप सह सनदी लेखापाल (सी.ए.) परीक्षेत चांगल्या गुणाने प्राविण्य मिळविले. विशेष म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मध्ये त्याचा 42 वा गुणानुक्रम आला. आई-वडीलांनी कधी ही कसलीही सक्ती केली नाही. पार्थने स्वतःच सर्व निर्णय घेतले. आई-वडीलांनीही प्रोत्साहन दिले तो शालेय जीवनापासूनच अभ्यास व खेळात अव्वल स्थानी आहे हे त्याचे वैशिष्ट्च म्हणावे लागेल, पार्थला खेळ, अभ्यासात आवड, सातत्यता करण्याची मानसिकता, ध्येयापर्यंत पोहोचण्याचा निर्धार आणि एकाग्रता यामुळेच यश मिळाल्याचे आवर्जुन म्हणतो.