पिंपरीत पेढे वाटून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी येथे पोचला असताना याची दखल घेत सरकारने दोन पावले पुढे टाकत सकारात्मक चर्चा करत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांच्या सर्व पितृसत्ताक रक्त नातेवाईकांना सगे सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे.या शासन निर्णयाचे स्वागत करीत पिंपरी चिंचवड मधील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करीत, गुलाल उधळून,एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.


यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,सचिन चिखले, धनाजी येळकर पाटील,संजय जाधव, अंगद जाधव, मीरा कदम,नलिनी पाटील,हरेश नखाते, ज्ञानदेव लोभे,काशिनाथ जगताप,युवराज कोकाटे,गणेश आहेर,दीपक तरडे,गोविंद पवार,किशोर आट्टरगेकर,नकुल भोईर,गोरख पाटील व बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते.











