शिक्षणाचे प्रणेते,क्रांतिसूर्य महात्मा फुले हे सामाजिक एकात्मता आणि न्याय यासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे थोर समाजसुधारक – आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विन्रम अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, सह शहर अभियंता बापू गायकवाड,उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पोलीस प्रशासनाचे राजेंद्र शिंदे,सामाजिक कार्यकर्ते शंकर लोंढे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.




















