ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

मराठ्यांच्या नादी लागायचं नाही … अध्यादेशाचा जो गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका – मनोज जरांगे

Spread the love

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होऊन त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं.

मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगेसोयऱ्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच जातप्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका..तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टीकला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले.

“सगेसोयरेसुद्धा आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश अवाश्यक होता. या आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे. आरक्षणासाठी कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघडं पडलं. मी समाजाला शब्द दिला होता की तुम्ही भोगलेला संघर्ष मी वाया दिला जाणार नाही. जो सग्यासोयऱ्याचा अध्यादेश काढला त्यानुसार ज्यांची कुणबी नोंद मिळाल्या त्यांच्या सग्यासोयऱ्यांना त्याच आधारावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अध्यादेशाचा जो गुलाल उधळला त्याचा अपमान होऊ देऊ नका. हा जीआर कायमस्वरुपी राहायला पाहिजे. शिंदे समितीला आणखी वर्षभर काम करु द्या,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

“मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्याने मराठवाड्याचे जे 1984 चे गॅझेट आहे ते शिंदे समितीने स्विकारावे आणि लागू करावे. त्यामुळे आमचा फायदा होणार आहे. ही जनता तुमची आहे. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आहे कारण ती एकवटली. बॉम्बे गॅझेट सुद्धा स्विकारण्यास सांगितले आहे. जिकडून होईल तिकडून आरक्षण घ्या,” असेही मनोज जरांगे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button