मंगला डोळे – सपकाळे यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लायन्स क्लब ऑफ पिंपरी-चिंचवडच्या वतीने आयोजित शिक्षक दिनाच्या विशेष कार्यक्रमात मंगला डोळे – सपकाळे यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे होते. यावेळी क्लबचे सेक्रेटरी अनिल गालिंदे, खजिनदार गजानन चिंचवडे, वुई टुगेदर संस्थेचे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, तसेच पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, वासंती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र काळे यांनी केले. सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन गजानन चिंचवडे यांनी केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगला डोळे – सपकाळे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रातील संघर्ष व यशाचा प्रवास उलगडला. लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही मामांच्या मार्गदर्शनाखाली संस्कारीत आणि निःस्वार्थी कार्याची प्रेरणा घेत समाजासाठी योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत करून उच्च शिक्षणापर्यंत पोहोचविले आहे.
मंगला डोळे – सपकाळे यांचे कार्य हे आदर्शवत असून अशा शिक्षिकेचा गौरव संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.














