अंतरमहाविद्यालयीन ‘विमा जागरूकता क्विझ’ स्पर्धेत भव्य चषक व 50 हजारांचा धनादेश आयुष वासवानी व नीरज बुधवानी यांनी पटकाविला
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एम.बी.ए. चे विद्यार्थी आयुष वासवानी व नीरज बुधवानी यांनी पटकाविला.
नॅशनल इन्श्युरन्स अकादमीच्या वतीने भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एल.आय.सी.) स्थापना करणारे सी.डी. देशमुख यांच्या 25 व्या वार्षिक स्मरणार्थ आंतर महाविद्यालयीन क्विझ स्पर्धा ‘विमा जागरूकता क्विझ’ स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 48 महाविद्यालयातील हुशार विद्यार्थ्यांना सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला होता.
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांच्या हस्ते प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा.गुरुराज डांगरे, प्रा. तुलिका चटर्जी समवेत प्रथम क्रमांक पटकाविणारे विजेते एम.बी.ए.चे विद्यार्थी आयुष वासवानी व नीरज बुधवानी यांना भव्य चषक व प्रत्येकी 25 हजारांचा धनादेश प्रदान केला. स्पर्धेत त्यांनी विम्यावरील त्याची प्रतिभा आणि ज्ञान दाखवून स्पर्धा जिंकत उपस्थितांनी मने जिंकली.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा, एम.बी.ए.चे संचालक डॉ.सचिन बोरगावे समवेत प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विशेष कौतुक करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.