यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पोस्ट मार्टमसाठीही नव्याने विस्तारीत कक्ष स्थापन करण्याची गरज – सचिन काळभोर

भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेता निवारा केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी या बरोबरच शवविच्छेदन कक्षाचे देखील विस्तारीकरण करावे, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये बहुतांशी महिलाच असतात. तसेच या ठिकाणी शिकाऊ डॉक्टरदेखील मोठ्या प्रमाणात सेवा बजावत असतात. यांना देखील रुग्णालयाच्या ठिकाणी विश्रांती व राहण्याची सोय केली पाहिजे. जेनेकरुन रुग्णांच्या सेवेसाठी त्यांना मदत होईल. याच उद्देशाने महापालिका प्रशासनाने वायसीएम रुग्णालयाच्या जवळच बांधलेल्या निवारा केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून ही इमारत रुग्णालयात बरोबरच पुणे जिल्हयातील रुग्ण देखील हजारोच्या पटीत उपचार घेण्यासाठी येतात. या वेळी रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाइक देखील त्यांची काळजी घेण्यासाठी सोबत असतात. परंतु, या ठिकाणी असलेली रुग्णांची संख्या पाहता व काही कारणास्तव या नातेवाईंकाना देखील वार्डमध्ये येत नाही. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
वायसीएममध्ये रुग्णांची खूप हेळसांड होत आहे. त्यामुळे 750 रुग्ण खाटाची व्यवस्था करण्यात आली. रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येत असतात. काही नातेवाईक रुग्णालयीत फरशीवर झोपून रात्र काढतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष नव्याने सुरु करण्यात येऊन महिलांना अंघोळ व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच स्वतंत्रपणे शव विच्छेदन रुग्णांच्या नातेवाईकांसाठी करून देण्यात य









