सामाजिक एकोप्याचा संदेश देत युवक राष्ट्रवादीचा ‘क्षितिज-२०२४’ उत्साहात
पिंपरी-चिंचवडमधील पहिलाच उपक्रम : प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश देत ‘क्षितिज-२०२४’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याला शहरातील ख्रिस्ती बिशप, ज्येष्ठ धर्मगुरू, उद्योजक आणि समाजसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘क्षितिज- २०२४’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, उपाध्यक्ष विशाल काळभोर, सरचिटणीस विशाल काळभोर, कार्याध्यक्ष फझल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी शहराच्या वतीने प्रथमच शहरातील खिस्ती बिशप, ज्येष्ठ धर्मगुरु, उद्योजक व समाजसेवक यांचा ‘नागरी सत्कार’ करण्यात आला.या प्रसंगी प्रसिद्ध किर्तनकार आचार्य वसंतराव गायकवाड यांचा सुमधुर किर्तनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवकचे शहराध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाने यांनी पुढाकार घेतला. उपाध्यक्ष अभिषेक केळकर, प्रतिश सावतडकर, सरचिटणीस सॅम्युएल मधुरे, संदेश चोपडे, तेजस गवळी, आकाश खरात, सचिव विल्यम यादव, सुमित जगधाने, मेल्विन नागरे, विल्सन यादव, संघटक सॅमसन अँथोनी यांनी आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉा. अमित त्रिभूवन यांनी केली. संगीत साथसंगत डॉ. जयंत जाधव, अभिषेक जाधव यांनी केली.
… या मान्यवर धर्मगुरूंचा केला गौरव
बिशप रेव्ह. अँड्र्यू राठोड, बिशप रेव्ह जोसेफ हिवाळे, रेव्ह. जोसेफ ढालवाले, पास्टर राजेश केळकर, पास्टर डॅनियल अँथनी, रेव्ह. सुखानंद डोंगरदिवे, पास्टर रमेश साळवी, डॅनियल दळवी, ऍड. प्रसाद सांगळे, ऍड. बाजीराव दळवी, नितीश दुबे, स्नेहल डोंगरदिवे या मान्यवरांना गौरव करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ६० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.