आचार्य आनंद ऋषीजी स्कूल कासारवाडी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आचार्य आनंदऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात अतिशय उत्साहात आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे माजी उपमहापौर आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,महावीर जैन विद्यालय होस्टेलचे सचिव आणि जेष्ठ लेखक,पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, ज्येष्ठ कवयित्री रंजना बोरा उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोककुमार पगारिया होते. या वेळी संस्थेचे विश्वस्त नयन भंडारी ,अनिलकुमार कटारिया,महावीर कुवाड, विलासकुमार पगारिया ,संदीप फुलफगर, कल्पेश पगारिया, किरण भंडारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मेघना जोशी, पर्यवेक्षिका सुलभा मुंगी ,श्री भालेसर, हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्याच्या माध्यमातून हा स्नेहसंमेलन सोहळा अतिशय रंगतदार आणि सुंदर रीतीने संपन्न केला.
पारितोषिक वितरण समारंभा मध्ये बोलताना डॉ सतीश देसाई म्हणाले” या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा सर्वसामान्य परिवारातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमी शुल्का मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा प्रा अशोककुमार पगारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. प्रशंसनीय आहे. विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये दिले जाणारे शिक्षण आणि संस्कार याचा आपल्या जीवनामध्ये अंमल करून जास्तीत जास्त उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आणि शाळेचे नाव उज्वल करावे”” यावेळी बोलताना श्री युवराज शहा म्हणाले “जीवनामध्ये आत्मविश्वास असण्याची अतिशय आवश्यकता आहे .आत्मविश्वास नसेल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही .
आचार्य आनंद ऋषीजी या महान संतांच्या नावाने सुरू झालेल्या या शाळेमध्ये विद्यार्थी निश्चितपणे शैक्षणिक प्रगती करून सुसंस्कार आत्मसात करतील .असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ” त्यांनी आपल्या खुमासदार आणि विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ अशोककुमार पगारिया यांनी पार्श्वनाथ क्रीडा मंडळाच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली, आणि शाळेचा इतिहास विशद केला आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. यावेळी जेष्ठ कवयित्री रंजना बोरा यांनी कार्यक्रमा वर शीघ्रपणे कविता तयार करून त्या कवितेचे वाचन केले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका आणि इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले सौ श्वेता गवाले ,मिनाक्षी अनूजे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ सुलभा मुंगी यांनी अहवाल वाचन केले तर सुवर्णा शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले तर कोरिओग्राफीची जबाबदारी शिल्पा लांडे तसेच सुवर्णा कुलकर्णी ,पुनम कांबळे प्रियांका यादव, सुषमा चौगुले,सुनिता सोनावणे , गोविंद चौधरी, धनश्री कुलकर्णी आदि शिक्षकांनी घेतली आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी सुंदर कार्यक्रम सादर केले.