27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पिंपरी चिंचवड मधील अमित गोरखे व प्रवीण निकम या दोन पुरस्कारर्थिना विशेष आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत होणार यंदाचा पुरस्कार सोहळा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षी 12 जानेवारी ला स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारत सरकार तर्फे राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जातात, भारतातील कुठलेही एक राज्य हा पुरस्कार सोहळा घेत असते,यावर्षी हा राष्ट्रीय युवा पुरस्कार महाराष्ट्रात, नाशिक या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
याच कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहरातून यापूर्वी राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेले दोन सन्माननीय युवा पुरस्कार्थिना निमंत्रण आले असून यामध्ये 2011/12 मध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेले चिंचवड येथील श्री अमित गोरखे व 2014/15 मध्ये पुरस्कार मिळालेले श्री प्रवीण निकम यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आजपर्यंत उपरोक्त दोघांनाच राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळालेला असून वयाच्या 28 वर्षाच्या आत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाच्या युवा मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरात हजारो महिलांसाठी राबवलेले संगणक साक्षरता अभियान, त्याचबरोबर कलारंग संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या सांस्कृतिक कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता तर प्रवीण निकम यांना लीडर शिप डेव्हल्पमेंट व क्वालिटी एज्युकेशन साठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
या निमंत्रना विषयी बोलताना अमित गोरखे म्हणाले, सत्ताविसावा राष्ट्रीय युवा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये होतोय याचा भरपूर आनंद आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्यांना निमंत्रण आले असून मलाही याचे निमंत्रण आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत हा पुरस्कार सोहळा अनुभवायला मिळेल यासाठी विशेष आनंद आहे. हा महोत्सव म्हणजे भारतातील युवा चैतन्याचा जागरच असतो.
प्रवीण निकम म्हणाले, दरवर्षी दिला जाणार राष्ट्रीय युवा पुरस्कार सोहळा नवीन पुरस्कार त्यांना एक नवीन उमेद देऊन जातो यावर्षी हा सोहळा महाराष्ट्रात होतोय याचा विशेष आनंद आहे.