१०० व्या नाट्य संमेलनाचे यजमान पद मिळणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी ऐतिहासिक घटना
प्रथमच पुणे जिल्ह्यातील चित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड – स्पर्धा १. शालेय गट, २. महाविद्यालयीन गट व ३. खुला गट अशी तीन गटात घेण्यात आली.नाट्यकलावंत व नाटकातील प्रसंग स्पर्धेसाठी हे दोन विषय देण्यात आले होते.स्पर्धेसाठी कालावधी कमी असूनही बहुसंखेने स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिध्द शिल्पकार / चित्रकार श्री. प्रमोद कांबळे वडि. वाय्. पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जयप्रकाश कळवले, यांनी केले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
शालेय गट – प्रथम क्रमांक – तन्मय महाजन – रु. ५ हजार, द्वितीय क्रमांक – आर्यन शिंदे – रु. ३हजार, तृतीय क्रमांक – वृंदा संभारम – रु. २ हजार, उत्तेजनार्थ – १. आर्यन आचार्य व २. तनय घाडगे – स्मृतिचिन्ह
महाविद्यालयीन गट – प्रथम क्रमांक – कृष्णा मेंगडे – रु. १० हजार, द्वितीय क्रमांक – विराज धांगडा – रु. ७ हजार, तृतीय क्रमांक – राहुल गवळी – रु. ५ हजार, उत्तेजनार्थ – अनिकेत पाटील व जिल सोळंकी – स्मृतिचिन्ह.
खुला गट – प्रथम क्रमांक – दिपक मडके – रु. १५ हजार, द्वितीय क्रमांक – स्वरुपा देशमुख – रु. १२ हजार, तृतीय क्रमांक – राहुल देडगे – रु. १० हजार, उत्तेजनार्थ – रमेश खडबडे व विनित नाटेकर – स्मृतिचिन्ह
दिनांक ६ व ७ रोजी शालेय स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन बालनगरीत तर महाविद्यालयीन व खुल्या गटांतील निवडक चित्रांचे प्रदर्शन रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस वितरण समारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष – भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष – कृष्णकुमार गोयल व कार्याध्यक्ष – राजेशकुमार साकला यांच्या हस्ते दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झाला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह – सुहास जोशी व कोषाध्यक्ष – राजू बंग यांचेसह चित्रकार प्रफुल्ल भिष्णूरकर व कलाक्षिक – लिना आढाव यांनी अथक परिश्रम घेतले.