अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरतनाट्यमला रसिकांची दाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळाला . या संमेलनाची मोठी पर्वणी पिंपरी चिंचवडकर व जवळपासच्या नागरिकांना मोठा आनंद घेता आला.
अनेक दिग्गज कलाकार,सामाजिकनेते,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,अनेक मंत्री मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी यास उपस्थिती दिली.दोन दिवसात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
आपल्या महत्वाच्या काही संस्कृती पैकी एक म्हणजे भरत नाट्यम् जी सद्या दुर्मिळ होत चालली आहे.
ही संस्कृती जतन करण्याचे मोठे काम अनेक संस्था करीत आहेत. या पैकीच एक कलावर्धिनीची कलाश्री नृत्यशाळा.चिंचवड मधील स्थानिक कलाश्री नृत्यशाळा संस्था यांना या संमेलनात भरत नाट्यम् मधून गणेश स्तवन सादर करण्याची संधी मिळाली.यामुळे स्थानिक कलाकारांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला.
संस्थेच्या प्रमुख सायली पवार काणे यांच्यासह त्यांच्या शिष्या ईश्वरी चव्हाण,पूर्वा क्षीरसागर ,ज्ञानिकी जोशी,आसावरी मधुकर बच्चे,तन्वी राजू कोरे,वरदा ताम्हाने,सिद्धी चोरडीया आदिनी ही सादरीकरण केले.
या वेळी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.त्यांनीही या भरत नाट्यम कला सादर करणाऱ्या कलाकारांना दाद दिली.
डॉ. संजीव पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.नाट्यगृह पूर्ण भरून गेले होते .
गणेश वंदना सादर करताना रसिकांनी तर अनेक वेळा टाळ्या वाजवून या कलाकारांना आशीर्वाद व शाबासकी दिली. समारोपाच्या दिवशी सकाळची सुरवातीचा कार्यक्रम या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रगृह चिंचवड येथे भरत नाट्यम् कलाकारांना सादर करण्यास मिळाल्यामुळे हे कलाकार सुद्धा खूप खुष होते .त्याचं ताकदीने त्यांनीही गणेश वंदनेतुन् अतिशय दर्जेदार आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
आयोजकांनी या संस्थेच्या कलाकारांना या नाट्य संमेलनात आपली कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेच्या प्रमुख सायली पवार / काणे ,सर्व कलाकार, पालक यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.