ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सुरू करा -ललित म्हसेकर

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी ते रहाटणी परिसरातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात गुरुवारी व पौर्णिमेला श्री क्षेत्र नारायणपूर येथे ये जा करतात, आपल्या परिसरातील नगरिकांसाठी  पिंपळे गुरव ते क्षेत्र नारायणपूर बस सेवा चालू करावी, अशी मागणी  भाजप सांगवी – रहाटणी मंडल उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी भाजप    शहराध्यक्ष  शंकर जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदन देताना यावेळी भाजप सांगवी रहाटणी अध्यक्ष संदीप नखाते, भाजप पिपंरी चिंचवड उपाध्यक्ष जवार ढोरे, सचिव गणेश ढोरे, कोषाध्यक्ष सखाराम रेडेकर, संजय गांधी निराधार सदस्य संजय मराठे, दिलीप तनपुरे, सचिन खराडे, शैलेश जाधव, अजय दुधभाते,साई कोंढरे, सागर दळवी,अविनाश खुंटे, संदीप नितनवरे, राहुल वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button