शहरात महिला उद्योग उभारण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन करणार मदत – अभय भोर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे महिला आणि तरुण तरुणींना उद्योजकांसाठी असोसिएशन तर्फे तंत्रशिक्षण आर्थिक तसेच शासकीय योजना आणि महिला उत्पादन निर्मिती प्रकल्प करून देण्यात येणार असून शहरातील महिला उद्योजकांना त्याद्वारे व्यासपीठ निर्माण करून शहरात महिला उद्योग उभारण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले.
शहरामध्ये अनेक महिला उद्योजक या उद्योगाची पूर्ण माहिती नसल्यामुळे पुढे येण्यास त्यांना संधी मिळत नाही.
अनेक स्टार्टअप उद्योग पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे येथे उभे राहू शकतात असोसिएशन तर्फे महिला उद्योजकांना संधी देण्यात येणारा असून पहिले पन्नास उद्योग प्रकल्प एकत्रित उभे करण्यात येणार आहेत महिला उद्योजकांना पापड लोणचे मसाला याव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये आणण्यासाठी अभय भोर हे पूर्णतः सहाय्य करणार असून महिलांच्या उत्पादनाला विक्री व्यवस्था निर्माण असोसिएशन मार्फत प्रयत्न केले जातील महिलांसाठी आधुनिक मशीनवर यांचे प्रशिक्षण तसेच व्यवसाय मार्गदर्शन मोफत त्यांना शासकीय योजनेचा लाभ तसेच मुद्रा योजना सीएम आणि पीएम योजनेमार्फत अनेक उद्योगात नवीन संधी निर्माण करून देण्यात येणार असून शहरातील पहिले समूह उद्योग योजना राबविण्यात येणार आहे असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज पत्राद्वारे सांगितले यासाठी प्रथम बैठक दोन जानेवारी रोजी भोसरी एमआयडीसी टि ९७ येथे आयोजित करण्यात येणार आहे त्याचा महिला उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.