उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे नववर्षानिमित्त रोप वाटप : उपक्रमाचे ७ वे वर्ष
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २०२४ नवीन वर्षानिमित्त नागरिकांना मोफत रोप वाटप करण्यात आले. २०१७ पासून गेल्या ७ वर्षांपासून पर्यावरण जागृती साठी हा अभिनव उपक्रम उन्नती सोशल फाऊंडेशन साठी राबविण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील स्व.बाळासाहेब कुंजीर मैदान , शिवार चौक येथे नागरिकांना रोप वाटप करण्यात आले. २०१७ पासून या उपक्रमा अंतर्गत आत्तापर्यंत १६००० वृक्ष वाटप करण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना , फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “बदलले निसर्गचक्र आणि वातावरणीय बदलामुळे , निसर्गाची अपरिमित हानी झालेली आहे. या सगळ्यावर प्रभावी उपाय म्हणजे , अधिकाधिक वृक्षारोपण करणे आणि वृक्षांचे संगोपन करणे. हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून , गेल्या ७ वर्षांपासून अविरतपणे उन्नती सोशल फाऊंडेशन नागरिकांना मोफत रोप वाटप करीत आहे.”
या उपक्रमाला शुभेच्छा देताना , राजवीर रहिवासी सोसायटीचे रमेश वाणी म्हणाले , “उन्नती सोशल फाऊंडेशनचा उपक्रम हा निश्चितच पथदर्शी आहे. पर्यावरण संगोपन आणि पर्यावरण जागृती संदर्भात उन्नती सोशल फाऊंडेशन देत असलेले योगदान हे निश्चितच कौतुकास्पद आहे.”
या उपक्रमाला शुभेच्छा देताना , श्रीकृष्ण निलेगावकर म्हणाले , “सामाजिक उपक्रमात उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच आघाडीवर आहे. एक झाड लावूया आणि एक झाड जगवूया या भूमिकेतून नवीन वर्षाचे पर्यावरण पूरक स्वागत करण्याचा उन्नती सोशल फाऊंडेशनचा उपक्रम हा सर्व नागरिकांमध्ये पर्यावरण प्रति जागृती निर्माण करणारी आहे.”
यावेळी वाल्मिक काटे,शेखर काटे, विकास काटे अतुल पाटिल सागर बिरारी विजय भांगरे विठाई वाचनालयचे सर्व सभासद आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद,ज्येष्ठ नागरिक संघांचे विलास जोशी व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.