ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) ख्रिश्चन सेल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी डॅनियल प्रकाश दळवी यांची निवड

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) – ख्रिश्चन सेल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी डॅनियल प्रकाश दळवी यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून ही निवड जाहीर करण्यात आली.

डॅनियल दळवी यांचे आजपर्यंतचे समाजातील सेवाभावी कार्य पाहता त्यांना ख्रिश्चन सेल चे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे. असे विचार यावेळी अजितभाऊ गव्हाणे यांनी व्यक्त केले.
पक्षाचे व समाजाचे काम चांगल्या प्रकारे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार करून माननीय अजित दादा पवार यांचे विचार सर्वदूर नेण्यास ही निवड सार्थ ठरविण्याचा निर्धार यावेळी डॅनियल दळवी यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ख्रिश्चन फोरम चे अध्यक्ष पास्टर राजेश केळकर, सचिव स्नेहल डोंगरदिवे, पास्टर डॅनियल अँथनी, उद्योजक विश्वास दळवी, हॅरी अँथनी, कुशल सोज्वळ, सुशांत बनकर, डॅनियल कांबळे, श्रेयस शिरसाठ व इतर अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button