अरंगेत्रममधून सादर केलेल्या नृत्यांने रसिक मंत्रमुग्ध

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भरत नाट्यम् या नृत्य शैलीतील अरंगेत्रम् हा आवर्णीय कार्यक्रम ग. दि. माडगुळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे सादर करण्यात आले. त्यास रसिकांनी टाळ्यांच्या कडकडातुन प्रतिसाद दिला.
कु.आसावरी मधुकर बच्चे,तन्वी राजू कोरे,वरदा जयकुमार ताम्हाने, सिद्धी पूनमचंद चोरडीया या मुलींच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आपल्या अप्रतिम कलेतुन रसिकांना 3 तास एका जागेवर खिळून ठेवले होते.वेळोवेळी रसिकांची दाद मिळणारी दाद , टाळ्याच्या कडकडाट असेच तीन तासाचे समिकरण झाले होते.
आमदार उमा खापरे व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वादक आणि गायक यांच्या तालावर होणारा पदण्यास ,अनेक दिग्गज सादरीकरणे सोबत प्रत्येक नृत्यास शोभेल अशी भरजरी वेशभूषा सुंदर मेकअप व प्रभावी प्रकाश – ध्वणी नियोजन असे कार्यक्रमाचे वर्णन होते.
आमदार उमा खापरे व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मुलींनी सादर केलेल्या कलेचे भर-भरून कौतुक केले.
तसेच आत्ताच्या काळात पालकांनी या मुलींना आपल्या संस्कृतीचा योग्य मार्ग निवडण्यास मदत केली व सर्व प्रकारचे कष्ट पालक घेतात ही बाब कौतुकास्पद आहे म्हणजेच यात पालकांचा मोठा वाटा आहे.
आपली संस्कृती जपण्याचे काम या मुली मेहनतीने करीत आहेत या पुढेही करावे व ज्या वेळी कोणतीही मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे दोघांनीही आपल्या भाषणात नमूद केले.
कलाश्री नृत्य शाळेच्या सायली पवार/काणे यांच्या मार्गदर्शनाने या मुलींचे या कलेचे शिक्षण पूर्ण झाले.म्हणजेच या मुलींच्या त्या गुरु आहेत.
या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवरांनी पूर्णवेळ उपस्थिती दिली.
आळंदी देवस्थांनचे विश्वस्त प्राध्यापक शिवाजीराव मोहिते,भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष् राजू दुर्गे,भाजपा गटनेते नामदेव ढाके,केमिस्ट असो.माजी अध्यक्ष संतोष खिवंसरा कुंदन इजन्सी संचालक अजय दर्डा,
भाजपा प्रदेश मनोज तोरडमल,मनसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, राष्ट्रवादी चिंचवड प्रमुख सागर चिंचवडे,जयदीप सिसोदिया ,मनसे विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत प्रभू,सचिन काळभोर,तुषार वऱ्हाडे,ऍड निकिता चिंचवडे ट्रान्सपोर्ट संचालक विष्णू गावडे,आदी मान्यवरांनी पूर्णवेळ उपस्थित राहून या मुलींचे सादरीकरण पाहून त्यांचे कौतुक केले.पालकांच्या वतीने योगिता चोरडीया यांनी सर्व पालकांच्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
रोहिणी मधुकर बच्चे ,गीता राजू कोरे,प्रगती जयकुमार ताम्हाने,योगिता पूनमचंद चोरडीया, कलाश्री नृत्य शाळा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.









