ताज्या घडामोडीपिंपरी

उपयोगकर्ता शुल्क वसुलीतून नागरिकांची मुक्तता!

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड  महापालिकेने मिळकतधारकांना लावलेल्या उपयोगकर्ता शुल्काला राज्य शासनाने स्थगिती दिल्यानंतर कर संकलन विभागाने मिळकतकर बिलाच्या संगणक प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांना उपयोग कर्ता शुल्क न भरता आपला मुळ मिळकत कर भरतात येणार आहे.

उपयोगकर्ता शुल्क वसूल करण्यास राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने तात्पुरती स्थगिती देत मुख्यमंत्र्यांसमवेत त्यासंदर्भात बैठक होईपर्यंत शुल्क वसुली न करण्याचे आदेश महापालिकेस  (दि. 20) डिसेंबर रोजी दिले. त्यानंतर आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी शासन आदेशाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना कर संकलन व कर आकारणी विभागाला दिल्या होत्या.

यानंतर कर संकलन व कर आकारणी विभागाने संगणक प्रणालीत बदल केला आहे. त्यानुसार 26 डिसेंबरपासून नागरिकांच्या ऑनलाईन बिलात उपयोग कर्ता शुल्क स्थगिती आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी थकीत आणि चालू कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार उपयोग कर्ता शुल्क वसुल करण्यास स्थगिती दिली आहे. त्यानुसार कर संकलन व कर आकारणी विभागाच्या संगणक प्रणालीत बदल करण्यात आला आहे.
शेखर सिंह,
आयुक्त तथा प्रशासक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button