मानवी जीवनातला आतील अंधकार मिटविण्याची क्षमता वेद, उपनिषदांमध्ये – आचार्य सोनेरावजी
दयानंद सरस्वती हे ऋषी परंपरेतील महान व्यक्ती – विदुषी अंजली आर्य
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बाहेरचा अंधकार सूर्य दूर करतो. मानवी जीवनातला आतील अंधकार मिटविण्याची क्षमता वेद, उपनिषदांमध्ये आहे. पुरातन शिक्षण पद्धतीत अध्यात्माद्वारे वेद, उपनिषदांचा अभ्यास करून “माणूस” घडविला जात होता. मात्र आधुनिक शिक्षण पद्धतीत भौतिक सुख साधनांचा वापर वाढला असून त्यातून फक्त उपभोक्ता (ग्राहक) घडवण्यासाठी लक्ष दिले जात आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांनी केले.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सल्लागार मुरलीधर सुंदरानी, सचिव हरेश तीलोकचंदानी, तबला वादक रमाकांत राऊत, नलिनी देशपांडे, उत्तम दंडीमे, आर्य वीर दलाचे शहर अध्यक्ष संजीव भाट, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, पंडित विश्वनाथ शास्त्री, अतुल आचार्य, वशिष्ठ मुनी, माजी नगरसेवक कुमार जाधव आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
शनिवारी बालकांच्या हस्ते होम हवन आणि रविवारी ५१ बहुकुंडीय यज्ञ पिंपरी आर्य समाजचे पुरोहित धर्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आर्यभक्त उपस्थित होते. तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या ९७ व्या बलिदान दिवस निमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रवचनकार विदुषी अंजली आर्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, वातावरणासह मनाची आणि अंतकरणाची शुद्धी करण्यासाठी अग्निहोत्र उत्तम साधन आहे. ऋषी दयानंद सरस्वती हे ऋषी परंपरेतील महान व्यक्ती आहेत. वेदांमध्ये विज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. विधवांसाठी, अनाथांसाठी काम करीत असताना जातीपाती तोडो समाज जोडो अशी हाक देऊन त्यांनी कार्य केले. घरातील मुलींसह महिलांनाही धर्मशिक्षण देणे अनिवार्य केले पाहिजे यासाठी त्यांनी काम केले. देशात हिंदू समाज टिकवायचा असेल तर महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार आणि धर्म जागवण्याची गरज आहे असेही विदुषी अंजली आर्या यांनी सांगितले.
स्वागत सुरेंद्र करमचंदानी, प्रास्ताविक उत्तम दंडीमे आणि आभार नलिनी देशपांडे यांनी मानले.