अहिल्यानगर येथील डॉ.सागर वाघ जिल्ह्यातील पहिले पिडियाट्रिक अॅलर्जिस्ट


अहिल्यानगर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अहिल्यानगर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. सागर वाघ यांनी दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन ‘अस्थमा व अॅलर्जी ‘ या विषयाच्या कोर्समध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे हा कोर्स उत्तीर्ण होऊन जिल्ह्यातील पहिले पिडियाट्रिक अॅलर्जीस्ट व लहान मुलांचे अॅलर्जी स्पेशालिस्ट होण्याचा मान डॉ. वाघ यांना मिळाला आहे.



अॅलर्जी हा बालवयातील कॉमन आजार असून, बाल व प्रौढांमध्ये विविध प्रकारे हा आजार असू शकतो. बालदमा, खाद्यपदार्थांची अॅलर्जीसारख्या शिंका येणे, त्वचेवर चट्टे येणे किंवा औषधांची,
कीटकांची अॅलर्जी असू शकते.

याशिवाय खाद्यपदार्थांद्वारे दूध, डाळी, अंडी, शेंगदाणे, भात अशी वेगवेगळ्या प्रकारची अॅलर्जी असू शकते. रेस्पिरेटरी, अॅलर्जीमध्ये बालदमा, धूळ, थंड पाणी, थंड हवा याची, तसेच परफ्यूम, पावडर याची देखील अॅलर्जी असू शकते. अॅलर्जीची लक्षणे, जीवाला धोका देणारी आढळून येतात. वाघ नर्सिंग होमच्या माध्यमातून मागील २० वर्षांपासून रुग्ण सेवेत कार्यरत असणारे डॉ. सागर वाघ आता रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीवरील उपचाराची सेवा देणारआहेत. लहान मुलांमधील बालदमा, अॅलर्जीचे आजार व त्यांचे निदान, उपचार तसेच यासाठीच्या स्किनप्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स, ऑक्सिमेट्री आदी तपासण्यांसाठी इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही. डॉ. सागर वाघ अहिल्यानगर जिल्हा मराठा
विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष स्व.रामनाथ वाघ यांचे चिरंजीव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व डॉ. धनंजय वाघ यांचे बंधू आहेत.








