ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ”शरदचंद्र महाआरोग्य अभियान ”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शरद पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात “शरदचंद्र महाआरोग्य अभियान” आयोजन करण्यात आले आहे. भारताचे माजी संरक्षणमंत्री व कृषिमंत्री तसेच माहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, पद्मविभुषण  शरद पवार स १२ डिसेंबर हा ८४ वा वाढदिवस संपन्न होऊन ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.  शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र व डॉक्टर सेल यांच्या माध्यमातून राज्यभरात ”शरदचंद्र महा आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.

महाआरोग्य अभियान १२/१२/२०२४ ते १२/०१/२०२५ पर्यंत असणार असून यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया तसेच ‘कृत्रिम हात व पाय वाटप अभियान’, ‘मोफत डोळ्यांचे तिरळेपणावर शस्त्रकीया’, ‘कॅन्सर आजारावरील शस्त्रक्रिया व महागडी चाचणी पेट स्कॅन फक्त रु. ७०००/-’, ‘मोफत गुडघा व खुबा सांधेरोपण शस्त्रक्रिया अभियान’, ‘मोफत प्रेग्नेंसी तसेच सिजरिंगचे शस्त्रक्रिया’, ‘मोफत दिव्यांग व्यक्तींकरिता इलेक्ट्रीकॅल बाइसिकल व कानाच्या श्रवण यंत्र वाटप’, ‘मोफत हृदयावरील शस्त्रक्रिया / अल्प दरात अँजिओग्राफी रु. १९९९/-’ या योजनांचा लाभ राज्यभरातील रुग्णांना घेता येईल. आरोग्य अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार  रोहित पवार , आमदार बापूसाहेब पठारे , पुण्याचे माजी महापौर  अंकुश  काकडे ,  प्रशांत जगताप , विकास पासलकर , तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ. सुनील जगताप, शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्य प्रमुख डॉ. सतीश कांबळे उपस्थित होते, तसेच  विठ्ठल शेठ मणियार यांच्या  हस्ते शरदचंद्र महाआरोग्य अभियानाचे लोक अर्पण करण्यात आले.

राज्यातील आरोग्य सेवा या खूप महागड्या झाल्या आहेत ज्या सर्वसामान्य लोकांच्या आटोक्या बाहेर आहेत. राज्यातील जनतेने या आरोग्य अभियानाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य अभियान पोहोचवावे हा आमचा एक प्रयत्न आहे.  आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे लक्षात घेऊन राज्यातील जनतेला निरोगी आयुष्य देण्याचा हा एक  संकल्प शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत , असे आमदार रोहित दादा पवार यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्याकरिता हेल्पलाइन नंबर वर कॉल करून रुग्णांनी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे संपर्क 9822059439.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button