चिंचवडताज्या घडामोडी

टाटा मोटर्स कामगारांचा  शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठींबा व्यक्त करण्यासाठी लोकनेते स्व.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परावाराच्या वतीने टाटा मोटोर्स कामगार मेळाव्याचे काळेवाडी येथिल इंदू लॉन्स मंगल कार्यालयात आयोजन करण्याच आले होते.
मेळाव्यात टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे आजी माजी प्रतिनिधी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यात प्रामुख्याने टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व भाजपा जेष्ठ नेते पै.ज्ञानेश्वर शेडगे, शंकर जगताप यांचे बंधू उद्योजक विजयशेठ जगताप, प्रबोधन मंचाचे शहर प्रमुख नरेंद्र पेंडसे, अविनाश आगज्ञान, उद्योजक आप्पासाहेब रेणूसे, नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, भारतकेसरी पै.विजय हनुमंत गावडे, ‘ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, पी.सी.एम.टी. चे माजी सदस्य संतोष माचुत्रे, टाटा मोटोर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी कार्याध्यक्ष सुभाष हुलावळे, प्रशांत पोमन, टाटा मोटोर्स युनियनचे प्रतिनिधी औदुंबर गणेशकर, सुजित साळुंखे, उमेश गायकवाड, नामदेव शिंत्रे, आनंद जुंगरे, टाटा मोटोर्स कामगार पतसंस्थेचे खजिनदार सुभाष दराडे यांसह अमोल देवकर, अमोल उंदरे, सुनील घुले, शशिकांत पाटील, दत्ताबुवा चिंचवडे, दिपक गावडे, संतोष निंबाळकर, सुनिल येवले आदी प्रमुख उपस्थित होते.

मेळाव्याची सुरवात टाटा मोटर्स कंपनीचे अध्यक्ष व पद्मश्री स्वर्गीय रतन टाटा साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली व्यक्त करून करून करण्यात आली.

‘चिंचवडचा होत असलेला विकास व चांगले मोठे प्रकल्प आणण्यात  लक्ष्मणभाऊ जगताप यांचा मोठा वाटा आहे व त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून विकासाचा दूरदृष्टीकोन व उच्चशिक्षीत असणारे शंकरभाऊ जगताप वाटचाल करीत आहेत. आपण सगळ्यांनी शंकरभाऊ जगताप यांच्या पाठीमागे उभं राहीले पाहीजे, असे सांगत शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष व भाजपा जेष्ठ नेते ज्ञानेश्वर शेडगे यांनी उपस्थित कामगारांना केले.

यावेळी प्रबोधन मंचाचे शहर प्रमुख नरेंद्र पेंडसे, टाटा मोटर्स प्रतिनिधी सुभाष हुलावळे, प्रशांत पोमण, बिभिषण चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शंकर जगताप यांना आपला पाठींबा जाहीर केला.

या टाटा मोटोर्स कामगार मेळावे यशस्वी व्हावा याकरिता युनियनचे माजी प्रतिनिधी कामगार नेते हरिभाऊ चिंचवडे व भाजपा शहर उपाध्यक्ष राकेश नायर यांनी प्रचंड परिश्रम घेतले. आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

मेळाव्याचे सूत्रसंचालन भारत भारी यांनी केले. तर आभार युनियनच प्रतिनिधी उमेश गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button