चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

राष्ट्रवादी युवककडून संघटनेला जोरदार उभारी तब्बल ७५ पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवीन पदनियुक्ती व युवक मेळावा शहरातील इंदू लॉन्स काळेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

राज्यातील घडामोडीनंतर शहरातील नव्या युवक अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. त्यानंतर आज प्रथमच शहराची नवीन जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तब्बल पंचाहत्तर नवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन संघटनेत सामावून घेण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे अध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्न डांगे आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजभैय्या चव्हाण, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित भ गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, चिंचवड विधानसभेचे नेते नाना काटे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजेंद्र जगताप, शाम आण्णा लांडे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, राहुल भोसले, राजेंद्र जगताप, संगितानानी ताम्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वा, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते प्रसन्न डांगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रवक्ते भागवत जवळकर, चेतन फेंगसे, नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतिक साळुंखे, नवनियुक्त पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष अक्षय माछरे, नवनियुक्त भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर युवती अध्यक्ष वर्षा जगताप , प्रवक्ते विनायक रणसुंभे, फजलभाई शेख , माजी स्वीकृत नगरसेवक गोरक्षनाथ लोखंडे, दीपक साकोरे, युवा नेते श्याम जगताप , चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता  कोकणे, कविता खराडे आजी माजी नगरसेवक युवकचे आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button