राहुल कलाटे यांचा प्रचार खोटा. नाशिक फाटा ते वाकड रस्ता तर आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांची देणगी – साहित्यिक सुरेश कंक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खोटे बोलणे, प्रसंगी अपक्ष म्हणून उभे राहणे,वारंवार पक्ष बदलणे , इति कामे राहुल कलाटे करीत आहेत.त्यांचा जो प्रचार चालू आहे तो मी देखल्या डोळ्या पाहिला आहे.
वास्तविक पाहता नाशिक फाटा ते पिंपळे गुरव या मोठ्या पुलाची रचना लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केली होती. त्याचे फलस्वरूप पिंपळे गुरव ते वाकड हा रस्ता खुला झाला. त्यामुळे वाकड गाव सर्वांना माहीत झाले. पण हे सर्व ज्ञात असूनही वेडावाकडा वाकड स्टाईल प्रचार पाहून खोटे किती बोलावे याची प्रचिती आली. वाकड गाव ज्यावेळी लोकांना नीट माहिती नव्हते ते या पिंपरी चिंचवडच्या नकाशात आणले ते आमच्या पिंपळे गुरव भागातील वैकुंठवासी लक्ष्मण जगताप यांनी.
फुकटचे श्रेय लाटू नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व गावांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यात आपण किती झोकून काम केले? की मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काम करत आहात हे सांगावे? सत्ता तर भारतीय जनता पक्षाच्या हातात होती. मग आपण आमच्या पिंपळे गुरव गावात येऊन अन् जाहीर प्रचार करून का उगीच खोटा प्रचार करीत आहात? आधी अपक्ष राहिलात आणि आता महाविकास आघाडीच्या सावलीत निवडणूक लढवीत आहात. किमान खोटे बोलू नये. आमच्याच गावात येऊन खोटा प्रचार करू नये.